IPL 2020, KKR vs RCB : मोहम्मद सिराजची धडाकेबाज कामगिरी, ठरला पहिलाच गोलंदाज

मोहम्मद सिराजने आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला न जमलेली कामगिरी केली आहे.

IPL 2020, KKR vs RCB : मोहम्मद सिराजची धडाकेबाज कामगिरी, ठरला पहिलाच गोलंदाज

अबुधाबी : आयपीएलमधील 39 वा (IPL 2020) सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) यांच्यात खेळला जात आहे. कोलकाताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आलेल्या कोलकाताच्या फलंदाजांना बंगळुरुच्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj)  सुरुवातीच्या ओव्हरमध्येच चांगलाच दणका दिला. मोहम्मद सिराजने टिच्चून मारा करत कोलकाताच्या फंलदाजांना घाम फोडला. मोहम्मद सिराजने दोन 2 चेंडूत 2 विकेट्स घेतल्या. सिराजने आयपीएलमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. IPL 2020 Royal Challengers Banglore Mohammed Siraj 1st Bowler To Bowl 2 Maidens Over Against KKR

काय आहे विक्रम?

मोहम्मद सिराजने आपल्या स्पेलमधील पहिल्या 2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने या 2 ओव्हरही विकेट मेडन टाकल्या. यासह आयपीएलमध्ये 2 मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम मोहम्मद सिराजने केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

विराटने मोहम्मद सिराजला सामन्यातील दुसरी ओव्हर टाकायला दिली. या ओव्हरमध्ये सिराजने सलामीवीर राहुल त्रिपाठीला आऊट केलं. यानंतर सिराजने पुढच्याच चेंडूवर नितीश राणाला क्लिन बोल्ड केलं. अशाप्रकारे सिराजने 2 चेंडूत 2 विकेट्स घेतल्याने त्याला हॅट्रिकची संधी होती. मात्र टॉम बँटनने सावधपणे तिसरा चेंडू खेळला. त्यामुळे हॅट्रिक झाली नाही. यानंतर सामन्याच्या 4 थ्या ओव्हरमध्ये टॉम बॅंटनला 10 धावांवर कॅचआऊट करत माघारी पाठवलं. या ओव्हरमध्येही सिराने एकही धाव दिली नाही. अशा प्रकारे सिराजने आपल्या स्पेलमधील पहिल्या 2 ओव्हर विकेट्स मेडन टाकल्या.

 

मेडन ओव्हर टाकणारे गोलंदाज

आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक गोलंदाजांनी मेडन ओव्हर टाकल्या आहेत. यामध्ये प्रविण कुमार अव्वल स्थानी आहे. प्रवीणने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 14 निर्धाव षटकं टाकली आहेत. तर यानंतर दुसऱ्या क्रमांकावर इरफान पटेलचा क्रमांक लागतो. इरफानने आयपीएलमध्ये एकूण 10 मेडन ओव्हर फेकल्या आहेत.

संबंधित बातम्या :

IPL 2020 : 41 वर्षीय गेलचा मोठा विक्रम, कोणत्याही फलंदाजाला जमणार नाही अशी कामगिरी 

IPL 2020 Royal Challengers Banglore Mohammed Siraj 1st Bowler To Bowl 2 Maidens Over Against KKR

Published On - 8:50 pm, Wed, 21 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI