AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, MI vs RCB : सामना एक, किस्से अनेक – सूर्यकुमारला डिवचण्याचा प्रयत्न, हार्दिक-मॉरिसचं शाब्दिक युद्ध, रवी शास्त्रींचा ‘सूर्य’नमस्कार

मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्सचा पराभव करत प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे.

IPL 2020, MI vs RCB : सामना एक, किस्से अनेक - सूर्यकुमारला डिवचण्याचा प्रयत्न, हार्दिक-मॉरिसचं शाब्दिक युद्ध, रवी शास्त्रींचा 'सूर्य'नमस्कार
| Updated on: Oct 29, 2020 | 4:27 PM
Share

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 48 वा सामना बुधवारी मुंबई इंडियन्स (Mumabai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challenegres Banglore) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) नेतृत्वात बंगळुरुवर 5 विकेट्सने सहज विजय मिळवला. या विजयासह मुंबई प्ले ऑफमध्ये (Play Off) पोहचणारी पहिली टीम ठरली. मुंबईकर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या विजयाचा हिरो ठरला. त्याने 43 चेंडूत 10 चौकार आणि 3 सिक्ससह नाबाद 79 धावांची धमाकेदार खेळी केली. सूर्यकुमारची या मोसमातील ही तिसरी अर्धशतकी खेळी ठरली. सूर्यकुमार आयपीएलच्या गेल्या 3 मोसमापासून सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करतोय. या सामन्यात अनेक किस्से पाहायला मिळाले. नक्की ते काय किस्से आहेत, बघुयात. IPL 2020 MI vs RCB Match One Many Stories Virat Sledge Suryakumar Hardik Morris War of Words Ravi Shastri Tweet

यूएईत ‘सूर्य’कुमार तळपळा

सूर्यकुमार आयपीएलमध्ये 2018 पासून सातत्याने चमकदार कामगिरी करतोय. सूर्यकुमारने 2018 मध्ये एकूण 14 सामन्यात 133.33 च्या स्ट्राईक रेटने आणि 36.57 च्या सरासरीने 4 अर्धशतकांच्या मदतीने 512 धावा केल्या होत्या. सूर्यकुमारची या मोसमातील 72 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. सूर्यकुमारने ही कामगिरी 2018 पासून ते आतापर्यंत कायम ठेवली आहे. सूर्यकुमारने 2019 च्या आयपीएल स्पर्धेत एकूण 16 सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व केलं. यात त्याने 130.86 च्या स्ट्राईक रेटने 424 धावा केल्या. यात 2 अर्धशतकांचा समावेश होता.

यानंतर यंदाच्या मोसमात सूर्यकुमारची बॅट आणखी आग ओकू लागली आहे. सूर्यकुमारने या मोसमात आतापर्यंत एकूण 12 सामन्यात 3 अर्धशतकांसह 362 धावा केल्या आहेत. नाबाद 79 हा त्याचा हाय स्कोअर आहे. सूर्यकुमारने निर्णायक वेळी मुंबईला विजय मिळवून दिला आहे. तसेच तो फिल्डिंगमध्येही चांगली कामगिरी करतोय.

सूर्यकुमारला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी का नाही?

आयपीएलचा 13 वा मोसम संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour Australia) जाणार आहे. या दौऱ्यासाठी काही दिवंसापूर्वीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. सूर्यकुमारला या दौऱ्यात नक्कीच स्थान मिळेल, अशी आशा सर्व सूर्यकुमार समर्थकांना होती. मात्र सर्वांची निराशा झाली. सूर्यकुमारला वगळण्यात आलं. सूर्यकुमारला नाकारण्यात आल्यानं निवड समिती आणि विराट कोहलीवर सोशल मीडियावरुन टीका करण्यात आली. सूर्यकुमार गलिच्छ राजकारणाराचा शिकार ठरला, असंही काही नेटीझन्सचं म्हणनं आहे.

रवी शास्त्रींचा ‘सूर्य’नमस्कार (Ravi Shastri)

सूर्यकुमारने बंगळुरुविरुद्धच्या शानदार खेळीद्वारे निवड समितीला चांगलीच चपराक लगावली. सूर्यकुमारचे या खेळीसाठी सर्वच स्तरातून कौतुक केलं गेलं. सूर्यकुमारची खेळी पाहून टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सूर्यकुमारला ट्विटद्वारे संदेश दिला. शास्त्रींनी फोटो ट्विटरवर शेअर केला. ‘सूर्य नमस्कार, असाच कणखर रहा आणि धीर ठेव, असा मेसेज शास्त्री यांनी दिला.

विराटने सूर्यकुमारला डिवचलं (Virat-Suryakumar)

बंगळुरुने मुंबईला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. विजयी आव्हानाचं पाठलाग करताना सूर्यकुमार चांगला खेळत होता. विकेट मिळत नसल्याने बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली हतबल झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे विराटने सूर्यकुमारला डिवचण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सामन्यातील दुसऱ्या डावातील 13 व्या षटकादरम्यान घडला. विराट स्ट्राईक एंडला असलेल्या सूर्यकुमारच्या दिशेने गेला. त्याला काहीही न बोलता ठस्सण देण्याचा प्रयत्न विराटने केला. मात्र सूर्यकुमारने विराटला प्रत्युत्तर न देता शांत राहिला, आणि नॉन स्ट्राईक एंडच्या दिशने निघून गेला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे विराटला नेटीझन्सनी चांगलेच फैलावर घेतले आहे.

हार्दिक पंड्या ख्रिस मॉरीस आमनेसामने (Hardik Pandya-Chris Moris)

आधी विराटने सूर्यकुमारला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर मैदानात ख्रिस मॉरीस आणि हार्दिक पंड्या यांच्यात हमरीतुमरी पाहायला मिळाली. मॉरीस 19 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमध्ये पंड्याने सिक्स खेचला. तर पुढच्या चेंडूवर पांड्या बाद झाला. त्यामुळे मॉरीस आणि पंड्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020: सूर्यकुमारच्या शानदार खेळीनंतर रवी शास्त्रींचं ट्विट, संतप्त चाहत्यांचा शास्त्रींवर हल्लाबोल

IPL 2020, MI vs RCB : सूर्यकुमार यादवची धमाकेदार खेळी, मुंबईची बंगळुरुवर 5 विकेट्सने मात, प्ले ऑफमध्ये धडक

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

IPL 2020 MI vs RCB Match One Many Stories Virat Sledge Suryakumar Hardik Morris War of Words Ravi Shastri Tweet

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.