आमच्या देशाकडून खेळणार का?, तडाखेबाज खेळीनंतर मुंबईच्या सूर्यकुमार यादवला ऑफर

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात तडाखेबाज खेळी करणाऱ्या मुंबईच्या सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिसने ऑफर दिली आहे.

आमच्या देशाकडून खेळणार का?, तडाखेबाज खेळीनंतर मुंबईच्या सूर्यकुमार यादवला ऑफर

यूएई : मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) बंगळुरुविरुद्धच्या (Royal Challengers Bangalore) सामन्यात तडाखेबाज खेळी करत मुंबईला अनमोल विजय मिळवून दिला. मुंबईच्या विकेट जात असताना त्याने खेळीपट्टीवर तग धरुन संघाला विजय मिळेपर्यंत अफलातून ब‌ॅटिंगचा नजारा सादर केला. सूर्यकुमारच्या या बहारदार खेळीनंतर न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिसने त्याला ऑफर दिली आहे. (Scott Styris) दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टीमकडून खेळू शकशील का?, असं ट्विट करत स्कॉटने सूर्यकुमारला न्यूझीलंडकडून (New Zealand) खेळण्याची ऑफर दिली आहे. (Suryakumar yadav Offer From New Zealand Player Scott Styris)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नुकताच भारतीय संघ जाहीर झाला आहे. चमकदार कामगिरी करुनही भारतीय संघात सूर्यकुमार यादवला निवड समितीने स्थान दिलेलं नाही. कालच्या बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात तुफानी खेळीदरम्यान त्याच्या मनात निवड न झालेलं शल्य जाणवत असल्याचं अनेक दिग्गज क्रिकेट जाणकारांचं मत आहे. अशातच स्कॉट स्टायरिसने ट्विट करत सूर्यकुमारला न्यूझीलंडकडून खेळण्याची ऑफर दिली आहे.

बंगळुरुविरूद्धच्या सामन्याच सूर्यकुमारने सुरुवातीपासून आक्रमक फटके मारुन आपले इरादे स्पष्ट केले होते. मुंबईला जिंकण्यासाठी कुणी तरी बॅट्समनने पीचवर राहून शेवटपर्यंत किल्ला लढवणं अपेक्षित असताना सूर्यकुमारने ही जबाबदारी मोठ्या खुबीने सांभाळत मुंबईला अफलातून विजय मिळवून दिला. सूर्यकुमारच्या या खेळीनंतर तो आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नसल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली आहे.

स्कॉट स्टायरिसची सूर्यकुमारला ऑफर

सूर्यकुमारच्या खेळीनंतर स्कॉट स्टायरिसने ट्विट करत म्हटलंय, सूर्यकुमार जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू इच्छित असेल तर तो परदेशी संघाकडून खेळू शकतो, असं म्हणत त्याने सूर्यकुमारला अप्रत्यक्षरित्या न्यूझीलंडकडून खेळण्याची ऑफर दिली आहे.

सूर्यकुमारची वादळी खेळी, टीम इंडियाच्या निवडीबाबत चर्चेला सुरुवात 

बंगळुरुने मुंबईला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 5 विकेट्स गमावून 5 चेंडूआधी पूर्ण केलं. मुंबईने 19.1 ओव्हरमध्ये 166-5 धावा केल्या. सूर्यकुमार यादव मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. सूर्यकुमारने 43 चेंडूत नाबाद 79 धावांची शानदार खेळी केली. यानंतर पुन्हा एकदा सूर्यकुमारच्या टीम इंडियामधील निवडीबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे.

सूर्यकुमारचा आयपीएलमध्ये दबदबा

सूर्यकुमार यादवने यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळताना 12 सामन्यांमध्ये 40.22 च्या सरासरीने 362 धावा फटकावल्या आहेत. यादरम्यान त्याने 48 चौकार आणि 8 षटकार ठोकले आहेत. या धावा त्याने 155.36 च्या स्ट्राईक रेटने जमवल्या आहेत. नाबाद 79 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएलच्या मागील मोसमात सूर्यकुमारने 16 सामन्यांमध्ये 424 धावा फटकावल्या होत्या. 2018 च्या आयपीएलमध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 512 धावा फटकावल्या होत्या.

देशांतर्गत क्रिकेटमध्येही ‘सूर्य’ तळपला

30 वर्षीय सूर्यकुमार यादवने देशांतर्गत क्रिकेटमध्येदेखील (Domestic cricket) उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. 77 प्रथम श्रेणी सामन्यांमद्ये त्याने 44 पेक्षा जास्त सरासरीने 5326 धावा फटकावल्या आहेत. यात 14 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. 93 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 35.46 च्या सरासरीने 2447 धावा फटकावल्या आहेत. यात 2 शतकं आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवचा जलवा पाहायला मिळाला आहे. 156 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 31.81 च्या सरासरीने आणि 140 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 3245 धावा फटकावल्या आहेत.

(Suryakumar yadav Offer From New Zealand Player Scott Styris)

संबंधित बातम्या :

IPL 2020, MI vs RCB : सूर्यकुमार यादवची धमाकेदार खेळी, मुंबईची बंगळुरुवर 5 विकेट्सने मात, प्ले ऑफमध्ये धडक

Australia Tour : सूर्यकुमारकडे निवड समितीचं पुन्हा दुर्लक्ष; हरभजन-मनोज तिवारी BCCI वर संतापले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI