AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, CSK vs KXIP : ऋतुराज गायकवाडची शानदार खेळी, चेन्नईचा पंजाबवर 9 विकेट्सने दणदणीत विजय

ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला.

IPL 2020, CSK vs KXIP : ऋतुराज गायकवाडची शानदार खेळी, चेन्नईचा पंजाबवर 9 विकेट्सने दणदणीत विजय
| Updated on: Nov 01, 2020 | 7:32 PM
Share

अबुधाबी : चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) किंग्ज इलेव्हन पंजाबवर (Kings XI Punjab ) 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. पंजाबने चेन्नईला विजयासाठी 154 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईने हे विजयी आव्हान 9 विकेट्स राखून 18.5 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला. ऋतुराजने 49 चेंडूत नाबाद 62 धावांची नाबाद खेळी केली. ऋतुराजने याखेळीत 6 फोर आणि 1 सिक्स लगावला. तर फॅफ डु प्लेसिसने 34 चेंडूत 4 फोर आणि 2 सिक्ससह 48 धावा केल्या. तर अंबाती रायुडूने नाबाद 30 धावा केल्या. पंजाबकडून ख्रिस जॉर्डनने एकमेव विकेट घेतली.

त्याआधी चेन्नईने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडले. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 153 धावा केल्या. पंजाबकडून दीपक हुड्डाने सर्वाधिक धावा केल्या. हुड्डाने 30 चेंडूत 4 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने 62 धावांची नाबाद खेळी केली. तर कर्णधार केएल राहुलने 29 आणि मयंक अग्रवालने 26 धावा केल्या. चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर, इमरान ताहिर आणि रवींद्र जडेजा या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.

IPL 2020 CSK vs KXIP Live Score Update Today Cricket Match Chennai Super Kings vs Kings Eleven Punjab लाईव्ह स्कोअरकार्ड

[svt-event title=”चेन्नईचा शानदार विजय” date=”01/11/2020,7:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक ” date=”01/11/2020,6:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईचा 15 ओव्हरनंतर स्कोअर” date=”01/11/2020,6:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला पहिला झटका” date=”01/11/2020,6:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईचा 8 ओव्हरनंतर स्कोअर” date=”01/11/2020,6:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईची शानदार सुरुवात” date=”01/11/2020,5:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 2 ओव्हरनंतर” date=”01/11/2020,5:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात” date=”01/11/2020,5:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 154 धावांचे आव्हान ” date=”01/11/2020,5:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दीपक हुड्डाचे अर्धशतक” date=”01/11/2020,5:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला सहावा झटका” date=”01/11/2020,4:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला पाचवा झटका” date=”01/11/2020,4:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला चौथा धक्का” date=”01/11/2020,4:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला तिसरा धक्का” date=”01/11/2020,4:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” पंजाबला दुसरा धक्का” date=”01/11/2020,4:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर पंजाब” date=”01/11/2020,3:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला पहिला धक्का” date=”01/11/2020,3:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबची चांगली सुरुवात” date=”01/11/2020,3:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 1 ओव्हरनंतर” date=”01/11/2020,3:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात” date=”01/11/2020,3:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”01/11/2020,3:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अशी आहे पंजाबची टीम” date=”01/11/2020,3:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईचे अंतिम 11 खेळाडू” date=”01/11/2020,3:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईने टॉस जिंकला” date=”01/11/2020,3:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

चेन्नई आणि पंजाब या दोन्ही संघांचा या मोसमातील साखळी फेरीतील हा शेवटचा सामना आहे. पंजाबला प्ले ऑफ फेरीतील आव्हान कायम राखण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवणं आवश्यक असणार आहे. तर चेन्नईचा या मोसमाचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. पंजाब पॉइंट्सटेबलमध्ये 12 गुणांसह 5 व्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई 10 गुणांसह शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे.

हे दोन्ही संघ या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने भिडत आहे. याआधी 4 ऑक्टोबरला दोन्ही संघ आपसात भिडले होते. या सामन्यात चेन्नईने पंजाबवर 10 विकेट्सने मात केली होती.

चेन्नई सुपर किंग्जस : महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय,अंबाती रायडू, फॅफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, लुंगी एन्गिडी, दीपक चहर, पीयूष चावला, इमरान ताहीर, मिशेल सॅंटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम कुरन, एन जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, ऋतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मा.

किंग्स इलेव्हन पंजाब : केएल राहुल (कर्णधार), मयंक अगरवाल, शेल्डन कॉट्रेल, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, जेम्स निशाम, निकोलस पूरन, ईशान पोरेल, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, कृष्णप्पा गौतम, हरप्रीत बरार, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, सरफराज खान, मनदीप सिंह, दर्शन नलकांडे, रवी बिश्नोई, सिमरन सिंह, जगदीश सुचित, ताजिंदर सिंह आणि हार्डस विलोजेन.

संबंधित बातम्या :

IPL 2020, KXIP vs CSK : शेन वॉटसन-फॅफ डु प्लेसिसची धमाकेदार खेळी, चेन्नईच्या किंग्सची पंजाबच्या किंग्सवर 10 विकेट्सने मात 

IPL 2020 CSK vs KXIP Live Score Update Today Cricket Match Chennai Super Kings vs Kings Eleven Punjab

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.