AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

25 षटकार आणि 15 चौकार! अभिषेक शर्माकडून तोडफोड, वनडेत द्विशतकी खेळीसह फॉर्म परतला

Abhishek Sharma Double Hundred: भारताचा स्टार फलंदाज अभिषेख शर्मा गेल्या काही सामन्यात फेल गेला. त्यामुळे त्याचं संघातील स्थान अडचणीत आलं आहे. असं असताना त्याने आपल्या द्विशतकी कामगिरीने लक्ष वेधून घेतलं आहे. 

25 षटकार आणि 15 चौकार! अभिषेक शर्माकडून तोडफोड, वनडेत द्विशतकी खेळीसह फॉर्म परतला
25 षटकार आणि 15 चौकार! अभिषेक शर्माकडून तोडफोड, वनडेत द्विशतकी खेळीसह फॉर्म परतलाImage Credit source: PTI
| Updated on: Aug 02, 2026 | 8:04 PM
Share

पंजाब क्रिकेट असोसिएशन दरवर्षी आंतर-जिल्हा वरिष्ठ वन-डे स्पर्धेचं आयोजन करते. या स्पर्धेत अमृतसर विरुद्ध तरन तारन हे संघ आमनेसामने आले होते. अमृतसर संघाकडून खेळणाऱ्या अभिषेक शर्माचं वादळ या स्पर्धेत घोंघावलं. अमृतसरने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 533 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना तरन तारन संघ 50 षटकांत 8 बाद 313 धावाच करू शकला. हा सामना अमृतसरने २२० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. अभिषेक शर्माने या सामन्यात अवघ्या 91 चेंडूत 233 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 25 उत्तुंग षटकार आणि 15 चौकार मारले. चौकार आणि षटकारांची गोळाबेरीज केलीतर 210 धावा त्याने केवळ बाउंड्रीजच्या मदतीने केल्या. इतकंच काय तर फलंदाजीनंतर अभिषेकने गोलंदाजीतही चमक दाखवत 9 षटकांत 71 धावा देत दोन गडी बाद केले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याचा फॉर्म परतल्याचे संकेत मिळत आहेत.

अभिषेक शर्माला सूर गवसला का?

अभिषेक शर्माचं भारतीय संघातील स्थान डळमळीत झालं आहे. गेल्या काही सामन्यांपासून त्याची बॅट शांत आहे. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात यावं अशी काही क्रीडातज्ज्ञ मागणी करत आहेत. मागच्या सात टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याला एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत तर त्याला दुहेरी धावही गाठता आली नव्हती. तीन डावात त्याने 1, 8 आणि 2 धावा केल्या होत्या. पण आता देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत द्विशतकी खेळीमुळे त्याने फॉर्मात परतल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढच्या मालिकेत निवड करताना निवडकर्त्यांना कारण देता येईल. इतकंच वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी त्याच्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलं आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी दावा!

अभिषेक शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त टी20 फॉर्मेटमध्ये खेळत आहे. त्यामुळे इतर फॉर्मेटसाठी त्याचा विचारही केला जात नाही. पण आता त्याने वनडे क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीमुळे भारतीय संघात एक आक्रमक पर्याय उपलब्ध होणार आहे. 50 षटकांच्या खेळात अभिषेक आपली छाप सोडू शकतो, तसेच संघाला आक्रमक सुरूवात करून देऊ शकतो असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. इतकंच काय तर गोलंदाजीतही आपली छाप सोडू शकतो. त्यामुळे निवडकर्ते त्याचा विचार करू शकतात.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं