CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्सच्या सुवर्ण पदकात किती सोनं असतं? ग्लासगो स्पर्धेतील मेडल कुठे तयार केले?

कॉमनवेल्थ गेम्स, एशियन्स गेम्स आणि ऑलिम्पिक स्पर्धेत विजेत्या स्पर्धकाला गोल्ड मेडल दिलं जातं. या पदकामध्ये सोन्याचा वापर केला जातो यात काही शंका नाही. पण त्याचं प्रमाण किती असत? इतर धातुंचं मिश्रण किती असतं? सविस्तर जाणून घ्या

CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्सच्या सुवर्ण पदकात किती सोनं असतं? ग्लासगो स्पर्धेतील मेडल कुठे तयार केले?
CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्सच्या सुवर्ण पदकात किती सोनं असतं? ग्लासगो स्पर्धेतील मेडल कुठे तयार केले?
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jul 23, 2026 | 3:05 PM

कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेला 23 जुलैपासून सुरूवात झाली आहे. ही स्पर्धा स्कॉटलँडची राजधानी ग्लासगो येथे होते आहे. या स्पर्धेत 70हून अधिक देशांचे 3000हून अधिक स्पर्धक भाग घेत आहेत. पण यंदाच्या स्पर्धेत खेळांची संख्या मर्यादीत करण्यात आली आहे. आता दहा क्रीडा प्रकारात वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं गेलं आहे. स्पर्धा कशीही असो पण त्यात जेतेपद मिळवण्याचं स्वप्न प्रत्येक स्पर्धक उराशी बाळगून असतो. आपल्याला गोल्ड मेडल मिळावं, असं सर्व सहभागी स्पर्धकांचं स्वप्न असतं. पण स्पर्धक गोल्ड मेडलसाठी जितकी ताकद आणि मेहनत घेतात, ते खरंच बावनकशी सोनं असतं का? तर त्याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. गोल्डसह सिल्व्हर ब्राँझ मेडलचं काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे मिळतील.

गोल्ड मेडलमध्ये काय असतं? किती प्रमाणात सोनं असतं?

कॉमनवेल्थ, एशियन्स गेम्स असो की ऑलिम्पिक या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाचा गोल्ड मेडल परिधान करून सन्मान केला जातो. या मेडलमध्ये खरं सोनं तर असतं. या पदकावर सोन्याचे जडावकाम केलेले असते. म्हणजे या पदकात काही प्रमाणात सोनं असतं. पण संपूर्ण सोन्याचं नसतं. या पदकाचा 92.5 टक्के भाग हा स्टर्लिंग सिल्व्हरचा म्हणजेच चांदीच्या विशेष प्रकाराचा असतो. यात किमान 6 ग्रॅम सोनं वापरलं जातं. शुद्ध सोन्याचं पदक काही मिळत नाही. कारण ही पदकं तयार करणं खूपच महागडं ठरतं. तसेच ती वाकण्याची शक्यताही असते. चांदी सोन्याच्या तुलनेत टणक असते. त्यामुळे त्यावर सोन्याचा मुलामा चढवला जातो. त्यामुळे पदकाला सोन्याची चमक राहते. दुसरीकडे, सिल्व्हर आणि ब्राँझ पदकांना अशी काही गरज नसते. सिल्व्हर मेडल पूर्णपणे स्टर्लिंग सिल्व्हर आणि ब्राँझ पदक पू्र्ण त्याच धातूने तयार केलेलं असतं.

ग्लासगो स्पर्धेचे पदक कुठे तयार केले गेलेत?

गोल्ड मेडल तयार करण्यासाठी किती खर्च हे निश्चित नाही. ग्लासगो गेम्समध्ये दिल्या जाणार्या पदकांची किंमतीचा खुलासा झालेला नाही. प्रत्येक गेम्समध्ये पदकाची किंमत वेगवेगळी असते. कारण त्यावेळचा त्या धातुचा भाव आणि मेडलच्या आकारावर ते ठरतं. पण रिपोर्टनुसार, एक गोल्ड मेडल तयार करण्यासाठी अंदाजे 1 ते 2 लाख रुपये खर्च येतो. ग्लासगोत विजेत्या स्पर्धकांना वितरीत केलेल्या स्पर्धकांना दिले जाणारे पदकं डिझाइनर मिलित्सा मिलन्कोवा यांनी सजवलं आहे. या पदकाची निर्मिती इंग्लंडच्या बर्मिंघमच्या क्राफ्ट एजेन्सी टॉय केनिंग अँड स्पेन्सरने केली आहे.

Follow Us