फुटबॉल सामन्यात मैदानावरच राडा, प्रेक्षकांनी थेट खेळाडूंनाच केली मारहाण, पाहा VIDEO

| Updated on: Aug 23, 2021 | 4:11 PM

जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असणाऱ्या फुटबॉलच्या सामन्याक प्रेक्षकांच महत्त्व खूप असतं. पण विचार करा हेच प्रेक्षक कधी फुटबॉलपटूंना मैदानात येऊन मारहाण करु लागले तर...

फुटबॉल सामन्यात मैदानावरच राडा, प्रेक्षकांनी थेट खेळाडूंनाच केली मारहाण, पाहा VIDEO
फुटबॉलच्या मैदानातच राडा
Follow us on

पॅरीस : कोरोनाच्या संकटामुळे अनेक सामने हे प्रेक्षकांविनाच खेळवण्यात आले. संपूर्ण ऑलिम्पिक प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळवलं गेलं. पण मूळात प्रेक्षक नसल्याने सामन्यांना मजाच नसते. त्यासाठीच आयपीएल सामन्यांना प्रेक्षकांचा खोटा आवाज देण्यात आला होता. जेणेकरुन टीव्हीवर सामना पाहताना अधिक रिएलस्टिक वाटेल. खेळाडूंमध्ये जोश कायम ठेवण्यासाठी आणि सामन्यांत खरी मजा, चुरस कायम ठेवण्याकरता प्रेक्षक महत्त्वाचे असतात. पण विचार करा हेच प्रेक्षक जर कधी रागात येऊन मैदानात शिरुन खेळाडूंनाच मारहाण करु लागले तर…हो असे झाले आहे. फ्रान्सच्या लीग 1 (LIGUE 1) मधील Nice vs Marseille यांच्या सामन्यादरम्यान Marseille संगाच्या खेळाडूंवर प्रेक्षकांनी हल्ला केलवा. यामध्ये दिमित्री पेयेट (Dimitri Payet) हा खेळाडू जखमी देखील झाला आहे.

ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा, Nice च्या संघाने 1-0 ची आघाडी घेतली होती. Marseille चा खेळाडू दिमित्री पेयेट कॉर्नर किक घेण्यासाठी गेला. त्यावेळी Nice च्या चाहत्यांनी त्याच्यावर बोटल फेकली. दिमित्रीने कॉर्नर न घेता ती बोटल पुन्हा प्रेक्षकांकडे फेकली. ज्यामुळे फॅन्सना खूप राग आला आणि ते थेट मैदानात उतरले आणि राडा घातला. बराच वेळ ही भांडण झाली सुरक्षारक्षक, खेळाडू आणि प्रेक्षक यांच्या गर्दीने मैदानात भरुन गेलं होतं..याचेच काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अखेर सामना रद्द करण्यात आला

मैदानातील दंगा पाहता सामन्यातील पंचानी खेळाडूंना मैदानाबाहेर पाठवले. Marseille च्या अध्यक्षांनी देखील या घटनेबाबत माहिती दिली. काही वेळानंतर Nice च्या खेळाडूंनी मैदानावर येत सामना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. पण Marseille संघाने साफ नकार दिला. LIGUE 1 च्या नियमांनुसार एखादा संघ सामना खेळणार नसल्यास समोरच्या संघाला 3-0 ने विजयी घोषित करण्यात येतं. पण या ठिकाणी सामना रद्द करण्यात आला.

इतर बातम्या

आईने शिवणकाम करुन वाढवलं, मुलीने विनाचप्पल स्पर्धा गाजवल्या, शैली सिंहच्या मेहनतीला देशाचा सलाम

तालिबानकडून अफगाणिस्तान क्रिकेट संघाबाबत मोठं वक्तव्य, क्रिकेट संघाच्या कर्णधाराची तालिबान अधिकाऱ्यांनी घेतली भेट, म्हणाले…

(In Football match between nice vs marseille dimitri payet was hit by fans on ground)