PHOTO : कॅप्टन कूल उतरला फुटबॉलच्या मैदानात, बॉलिवुड सिताऱ्यांसह केले दोन हात

आयपीएल सामन्यांच्या तारखा जाहिर झाल्या असून धोनी चाहत्यांना लवकरत धोनीचा जलवा मैदानावर पाहायला मिळणार होता. पण त्यापूर्वीच धोनी मैदानात उतरला आहे, पण क्रिकेटच्या नव्हे तर फुटबॉलच्या...

| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 12:42 PM
1 / 5
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे (MS Dhoni) चाहते त्याला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. दरम्यान 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या उर्वरीत आय़पीएलमध्ये धोनी मैदानावर उतरणार असला तरी त्यापूर्वीच चाहत्यांना त्याचा खेळ पाहायला मिळाला. फरक एवढाच की धोनी क्रिकेटच्या नाही तर फुटबॉलच्या मैदानात खेळताना दिसला. मुंबईत ऑल स्टार्स फुटबॉल क्लबद्वारे घेण्यात आलेल्या चॅरीटी मॅचमध्ये धोनी फुटबॉल खेळत होता. (फोटो सौजन्य - All stars FC)

2 / 5
धोनी खेळत असलेल्या या सामन्यात बॉलीवुडमधील अनेक सिनेकलाकारांनी देखील सहभाग घेतला असून धोनीसह मैदानात खेळताना हे सारेच दिसून आले. यामध्ये सिनेमा कलाकारांसह छोट्या पडद्यावरील काही अभिनेतेही होते. (फोटो सौजन्य - All stars FC)

3 / 5
मुंबईत ऑल स्टार फुटबॉल क्लबद्वारे चॅरीटीसाठी घेण्यात येणाऱ्या या सामन्यात धोनीसह अर्जून कपूर, टायगर श्रॉफ, रणवीर सिंगसारखे अनेक सिनेकलाकार देखील आहेत.

4 / 5
हे सर्व सामने मुंबईतील वांद्रे फुटबॉल ग्राउंड या ठिकाणी खेळवले जात आहेत. यामध्ये सिनेकलाकारांसह, खेळाडू आणि नामांकित व्यक्ती फुटबॉल सामने खेळताना दिसून येतात.  (फोटो सौजन्य - All stars FC)

5 / 5
आयपीएलच्या उर्वरीत सामने दीड महिन्याचा कालावधी राहिला आहे. सामन्यांची सुरुवातच धोनीची सीएसके आणि रोहितच्या मुंबई इंडियन्सपासून होणार आहे. अशावेळी फुटबॉल सामने खेळून धोनी स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न देखील करत आहे. (फोटो सौजन्य - All stars FC)