AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2026: ख्रिस्तियानो रोनाल्डोची पोर्तुगाल संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती, 27 सदस्यीय संघाची घोषणा

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या पोर्तुगाल संघाने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वात संघाची घोषणा केली आहे.

FIFA World Cup 2026: ख्रिस्तियानो रोनाल्डोची पोर्तुगाल संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती, 27 सदस्यीय संघाची घोषणा
FIFA World Cup 2026: ख्रिस्तियानो रोनाल्डोची पोर्तुगाल संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती, 27 सदस्यीय संघाची घोषणाImage Credit source: TV9 Network/Money9 वरून
| Updated on: May 19, 2026 | 8:26 PM
Share

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा 12 जुनपासून सुरू होणार आहे. एकूण 48 संघ मैदानात उतरणार असून प्रत्येकी 4 संघ असलेले 12 गट तयार करण्यात आले आहेत. अंतिम सामना 20 जुलै रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी 48 संघांनी तयारी केली असून पोर्तुगालही यात कुठे मागे नाही. पोर्तुगालकडून रॉबर्टो मार्टिनेझ यांनी 27 सदस्यीय संघाची घोषणा केली. ख्रिस्तियानो रोनाल्डो आपल्या विक्रमी सहाव्या फिफा विश्वचषक स्पर्धेत पोर्तुगालचे नेतृत्व करेल. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कारकिर्दीतील शेवटचा वर्ल्डकप असण्याची शक्यता आहे. कारण ख्रिस्तियानो रोनाल्डो आता 41 वर्षांचा आहे. पोर्तुगालचा आतापर्यंतचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू रोनाल्डो, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणाऱ्या या स्पर्धेत आपल्या पहिल्या विश्वचषक विजेतेपदासाठी प्रयत्नशील असेल.

पोर्तुगालचा दिवंगत स्टार फुटबॉलपटू डियोगो जोटाचा या संघात समावेश करण्यात आला आहे. 28 वर्षीय जोटाचा कार अपघातात मृत्यू झाला होता. दिवंगत डियोगो जोटा याच्या सन्मानार्थ त्याची एक अतिरिक्त सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. रिकार्डो वेल्हो याला संघात चौथ्या क्रमांकाचा गोलकीपर म्हणून नियुक्त केले आहे. कारण फिफा अधिकृत संघात जास्तीत जास्त 26खेळाडूंनाच परवानगी देते. पण पोर्तुगालने 27 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. तीन नोंदणीकृत गोलकीपरपैकी एकाला दुखापत झाल्यास वेल्हो यांना संघात समाविष्ट केले जाऊ शकते.

पोर्तुगालच्या आक्रमणाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोनाल्डो आपला कट्टर प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीसोबतच्या आणखी एका रोमांचक लढतीसाठी सज्ज झाला आहे. या दोघांचा शेवटचा विश्वचषक असू शकतो. पोर्तुगाल संघ क गटात आहे. या गटात डीआर काँगो, उझबेकिस्तान आणि कोलोंबो हे संघ आहेत. त्यानंतर 32 संघ पुढच्या फेरीत खेळतील. राउंड 16 होईल आणि उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडतील.

फिफा विश्वचषक २०२६ साठी पोर्तुगालचा संघ:

गोलरक्षक : डिओगो कोस्टा, जोस सा, रुई सिल्वा; रिकार्डो वेल्हो 

बचावपटू : डिओगो डालोट, मॅथ्यूस नुनेस, नेल्सन सेमेडो, जोआओ कॅन्सेलो, नुनो मेंडेस, गोंकालो इनासिओ, रेनाटो वेगा, रुबेन डायस, टॉमस अरौजो 

मिडफिल्डर : रुबेन नेव्हस, सॅम्युअल कोस्टा, जोआओ नेव्हस, विटिन्हा, ब्रुनो फर्नांडिस, बर्नार्डो सिल्वा

फॉरवर्ड्स : जोआओ फेलिक्स, फ्रान्सिस्को त्रिंकाओ, फ्रान्सिस्को कॉन्सेकाओ, पेड्रो नेटो, राफेल लिओ, गोंकालो गुएडेस, गोंकालो रामोस, ख्रिस्तियानो रोनाल्डो, डिओगो जोटा

Follow Us
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला