Pro kabbadi league: अभिषेक बच्चनच्या टीमने पुण्याला हरवलं

प्रो कबड्डी लीगमध्ये आज झालेल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटनचा 31-26 असा पाच गुणांच्या फरकाने पराभव केला. जयपूरच्या संघाचा मोसमातील हा तिसरा विजय आहे.

Pro kabbadi league: अभिषेक बच्चनच्या टीमने पुण्याला हरवलं

बंगळुरु: प्रो कबड्डी लीगमध्ये आज झालेल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटनचा 31-26 असा पाच गुणांच्या फरकाने पराभव केला. जयपूरच्या संघाचा मोसमातील हा तिसरा विजय आहे. जयपूरकडून अर्जुन देसवालने शानदार खेळ दाखवत 11 गुणांची कमाई केली. पुण्याकडून अस्लम इनामदारने सर्वाधिक 6 गुण घेतले. (Pro kabbadi league jaipur pink panthers beat puneri paltan)

पंकज मोहिते, नितीन तोमरने प्रत्येकी चार-चार पॉईंट मिळवले. जयपूर पिंक पँथर्सने हा सामना पकडीच्या खेळामुळे जिंकला. त्यांनी टॅकलमध्ये 11 तर पुण्याने आठ पॉईंट मिळवले. दोन्ही संघांनी रेड म्हणजे चढाईत तोडीस तोड खेळ केला. पुण्याने रेडमध्ये 16 तर जयपूरने 15 पॉईंट मिळवले.

जयपूरकडून रेडमध्ये अर्जून देसवालच प्रभावी ठरला. त्याच्या व्यतिरिक्त अन्य रेडर विशेष काही करु शकले नाहीत. जयपूरकडून टॅकलमध्ये शौल कुमार आणि संदीप धुलने महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांनी प्रत्येकी चार-चार पाँईट मिळवले. तेच जयपूरच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले.

संबंधित बातम्या:

Ajinkya Rahane: खासदार गौतम गंभीर यांचा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर कुठला जुना राग आहे?
IND vs SA: पुजारा-रहाणेसाठी अय्यर-विहारीचा बळी देणार, राहुल द्रविडने दिले संकेत
धोनीने पाकिस्तानी क्रिकेटपटूला दिलं मोठ गिफ्ट, आनंदीत झालेला हॅरीस रौफ म्हणाला….

(Pro kabbadi league jaipur pink panthers beat puneri paltan)

Published On - 9:59 pm, Fri, 7 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI