Marathi News » Sports » Cricket news » Mp & former cricketer Gautam Gambhir had any old rivalry with indian cricket team player Ajinkya rahane
Ajinkya Rahane: खासदार गौतम गंभीर यांचा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर कुठला जुना राग आहे?
जोहान्सबर्ग कसोटी अजिंक्य रहाणेच्या करीयच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती. कारण दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होण्याआधीपासून राहणेच्या संघातील निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.
जोहान्सबर्ग कसोटी अजिंक्य रहाणेच्या करीयच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती. कारण दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होण्याआधीपासून राहणेच्या संघातील निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.
1 / 10
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दोन कसोटीच्या पहिल्या तीन डावात त्याला विशेष काही करुन दाखवता आलं नाही. जोहान्सबर्गच्या पहिल्या डावात तर रहाणे शुन्यावर बाद झाला. त्यामुळे त्याच्या करीयरबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
2 / 10
पण दुसऱ्याडावात संघाला गरज असताना त्याने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे तिसऱ्या कसोटीतही रहाणेला संधी मिळू शकते. कारण कॅप्टन विराट कोहली आणि ऋषभ पंत यांची सुद्धा आकडेवारी फार चांगली नाहीय. त्यांचा सुद्धा तसाच फॉर्म आहे.
3 / 10
अजिंक्यने आता फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिलेत, त्यामुळे त्याला संधी मिळाली पाहिजे असे अनेकांचे मत आहे. पण दिल्लीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर सातत्याने अजिंक्य रहाणेला लक्ष्य करत आहेत.
4 / 10
अजिंक्यने अर्धशतक झळकावलं असलं, तरी त्याला संघाबाहेर करा, अशी त्यांची मागणी आहे.
5 / 10
अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली असली, तरी केपटाउन कसोटीत त्याच्याजागी हनुमा विहारीला संधी मिळाली पाहिजे, असं गौतम गंभीरचं मत आहे.
6 / 10
"अजिंक्य रहाणे चांगला खेळला, यात दुमत नाही. पण भविष्याचा विचार केला, हनुमा विहारीची कामगिरी बघितली तर त्याला सुद्धा संधी मिळाली पाहिजे" असं गौतम गंभीरने दोन दिवसांपूर्वी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटलं होतं.
7 / 10
आजही गौतम गंभीरने तशाच स्वरुपाचं विधान केलय.
8 / 10
"विहारीला पुढच्याकसोटीत संधी मिळाली नाही, तर ते दुर्देवी ठरेल. अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकावलं, असेल तर हनुमा विहारी सुद्धा 40 धावांवर नाबाद आहे. दुसऱ्याडावात विहारीने रहाणेच्या जागी बॅटिग केली असती, तर त्याने सुद्धा अर्धशतक झळकावलं असतं" असं गंभीर स्टार स्पोटर्सवर म्हणाला.
9 / 10
गौतम गंभीरची ही विधान पाहिल्यानंतर अजिंक्य रहाणेवर त्यांचा कुठला जुना राग आहे का? असा प्रश्न निर्माण होतोय.