Hockey WC 2026: हॉकी वर्ल्डकप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, या दिवशी भारत पाकिस्तान भिडणार

हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. पुरूष आणि महिला हॉकी वर्ल्डकप स्पर्धेचं यंदा 16वं पर्व असून दोन्ही फॉर्मेटमध्ये प्रत्येकी 16 संघ सहभागी होणार आहे. चला जाणून घेऊयात या स्पर्धेबाबत सविस्तर...

Hockey WC 2026: हॉकी वर्ल्डकप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, या दिवशी भारत पाकिस्तान भिडणार
Hockey WC 2026: हॉकी वर्ल्डकप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, या दिवशी भारत पाकिस्तान भिडणार
Image Credit source: Hockey India Twitter
| Updated on: Aug 11, 2026 | 7:03 PM

हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या 16व्या पर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 15 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. एकाच वेळी महिला आणि पुरूष गटाचे सामने होणार आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन्ही विश्वचषक स्पर्धा एकाच कालावधीत 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2026 दरम्यान नेदरलँड्स आणि बेल्जियम येथे संयुक्तपणे खेळले जाणार आहेत. पुरूष आणि महिला हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत प्रत्येकी 16 संघ भाग घेणार आहेत. साखळी फेरीचे सामने 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान होतील. त्यानंतर क्रॉसओव्हर सामने 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान खेळले जातील. उपांत्य फेरीचे सामन्यात थोडा बदल आहे. महिलांचा उपांत्य फेरीचे सामने 27 ऑगस्टला, पुरूषांचे उपांत्य फेरीचे सामने 28 ऑगस्टला खेळले जातील. अंतिम फेरीच्या सामन्यातही थोडा बदल आहे. महिलांचा अंतिम फेरीचा सामना 29 ऑगस्ट, तर पुरूषांचा अंतिम फेरीचा सामना 30 ऑगस्टला होणार आहे.

पुरूष हॉकी वर्ल्डकप 2026

पुरूष हॉकी स्पर्धेत एकूण 16 संघ असून त्याची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात नेदरलँड, अर्जेंटीना, न्यूझीलंड आणि जापान हे संघ आहेत. ब गटात बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि मलेशिया हे संघ आहेत. क गटात ऑस्ट्रेलिया, स्पेन, आयर्लंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. तर ड गटात भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि वेल्स हे संघ आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने साखळी फेरीत आमना सामना होणार आहे.

भारतीय पुरूष संघाचे सामने

  • 15 ऑगस्ट 2026, भारत विरुद्ध वेल्स, दुपारी 4:30 वाजता
  • 17 ऑगस्ट 2026, भारत विरुद्ध इंग्लंड, संध्याकाळी 6:30 वाजता
  • 19 ऑगस्ट 2026, भारत विरुद्ध पाकिस्तान, संध्याकाळी 6:30 वाजता

महिला हॉकी वर्ल्डकप 2026

पुरूषांप्रमाणे महिला हॉकी वर्ल्डकप स्पर्धेतही 16 संघ भाग घेणार असून चार संघाचे प्रत्येकी चार गट पाडले आहे. अ गटात नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, चिली आणि जापान हे संघ आहेत. ब गटात अर्जेंटिना, जर्मनी, युएसए आणि स्कॉटलँड हे संघ आहेत. क गटात बेल्जियम, स्पेन, न्यूझीलंड आणि आयर्लंड हे संघ आहे. ड गटात भारत, चीन, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत.

भारतीय महिला संघाचे सामने

  • 16 ऑगस्ट 2026 (रविवार), भारत विरुद्ध चीन, दुपारी 4:30 वाजता, वेगनार स्टेडियम, आम्सटेलवीन
  • 18 ऑगस्ट 2026 (मंगळवार), भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका, संध्याकाळी 6:30 वाजता, वेगनार स्टेडियम, आम्सटेलवीन
  • 20 ऑगस्ट 2026 (गुरूवार), भारत विरुद्ध इंग्लंड, संध्याकाळी 6:30 वाजता, वेगनार स्टेडियम, आम्सटेलवीन

हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धा कुठे पाहता येईल?

हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डीडी स्पोर्ट्सवर होणार आहे. तर जिओ हॉटस्टारवर एप ऑनलाईन स्ट्रिमिंग असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us