T20 World Cup : “पाकिस्तान संघ कराची विमानतळासाठी क्वालीफाय”, चाहत्यांचे मजेदार मीम्स

कालच्या झालेल्या टीम इंडियाच्या आणि आफ्रिकेच्या मॅचवेळी पाकिस्तानच्या चाहत्यांनी टीम इंडियाला सपोर्ट केला.

T20 World Cup : पाकिस्तान संघ कराची विमानतळासाठी क्वालीफाय, चाहत्यांचे मजेदार मीम्स
"पाकिस्तान संघ कराची विमानतळासाठी क्वालीफाय", चाहत्यांचे मजेदार मीम्स
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 31, 2022 | 8:28 AM

मेलबर्न : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) पाकिस्तान टीमच्या (Pakistan Team) चुकीच्या कामगिरीमुळे चाहते एकदम संतप्त झाले आहेत. कारण पाकिस्तान टीमकडून मॅच सुरु असताना चुकीचे निर्णय आणि चुकीच्या फिल्डींगमुळे त्याचा पराभव झाला आहे. टीम इंडियाविरुद्ध (Team India) सुरुवातीला झालेल्या रोमांचक मॅचमध्ये पाकिस्तान खेळाडूंनी अनेक चुका केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानच्या माजी दिग्गज खेळाडूंनी टीममधील खेळाडूंवर अधिक टीका केली. सध्या पाकिस्तान टीममधील अनेक खेळाडूंचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

कालच्या झालेल्या टीम इंडियाच्या आणि आफ्रिकेच्या मॅचवेळी पाकिस्तानच्या चाहत्यांनी टीम इंडियाला सपोर्ट केला. कारण काल टीम इंडिया जिंकली असती. तर पाकिस्तान टीमला सेमीफायनलमध्ये येण्याचा रस्ता स्पष्ट झाला असता. परंतु आता पाकिस्तान सेमीफायनलमध्ये येणे दुरापास्त झाले आहे.

पाकिस्तान टीमने उरलेल्या सगळ्या मॅच जिंकल्या, तरी सुद्धा पाकिस्तान टीम सेमीफायनलमध्ये पोहचू शकत नाही अशी सद्याची स्थिती आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंच्या नावाने अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. सद्या सोशल मीडियावर बाय बाय हॅशटॅग सुरु आहे.