AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप सत्तेत आल्याने आमचे चांगले दिवस नाही, तर… मोहन भागवत काय म्हणाले?

भाजप सत्तेत आल्यामुळे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला चांगले दिवस आले का? या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे, तसेच त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका देखील मांडली.

भाजप सत्तेत आल्याने आमचे चांगले दिवस नाही, तर... मोहन भागवत काय म्हणाले?
मोहन भागवत Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 08, 2026 | 2:51 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्त आरएसएसकडून  विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.  मुंबईतील वरळी डोममध्ये संघाचे मनोमिलन सुरू आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहोन भागवत यांनी विविध मुद्यांवर आपले विचार मांडले आहेत. भाजप सत्तेत आल्यामुळे संघाचे चांगले दिवस सुरू झाले आहेत का? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. भाजप सत्तेत आल्याने संघांचे चांगले दिवस आले का तर हे उलट आहे. आमच्या मेहनतीमुळे आमचे चांगले दिवस सुरु झाले, असं यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत? 

भाजप सत्तेत आल्यामुळे संघाचे चांगले दिवस सुरू झाले आहेत का? असा प्रश्न यावेळी मोहन भागवत यांना यावेळी विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपा सत्तेत आल्याने संघांचे चांगले दिवस आले का? तर हे उलट आहे. आमच्या मेहनतीमुळे आमचे चांगले दिवस सुरु झाले आहेत. आम्ही अयोध्या, राम जन्मभूमी आंदोलन सुरु केलं, लोक जोडली गेली. लोकांना आमची भूमिका पटली, लोकांपर्यत पोहचणे आणि त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करणं हे आमचं काम आहे, असं यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

आमची शक्ती आहे, लोकं आमचं ऐकत असतील तर त्यांचा फायदा होतो.  त्यांनी आमची साथ दिली म्हणून त्यांना चांगले दिवस आले.  आम्ही भाजपवर कोणताही दबाव टाकला नाही, आमच्या संघाच्या शाखेत कोणतेही राजकारण होत नाही. आम्हला कुणी सल्ला मागितला तर सर्वांना मिळणार. त्यांचं पुण्य त्यांच्याकडे, त्यांचं पाप थोडं आमच्याकडे कारण ते आमच्याकडून गेले आहेत.  राजकारणत कुणाचाही दबाव नसतो, असेल तर तो मतदारांचा असतो, असंही यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!