AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर अमेरिकेतून संकट धडकलं? भारतावर 100 टक्के टॅरिफ…डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर मोठा अलर्ट!

भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात कमी केली तर त्याचे परिणाम केवळ भारतापुरते मर्यादित राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अखेर अमेरिकेतून संकट धडकलं? भारतावर 100 टक्के टॅरिफ...डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर मोठा अलर्ट!
donald trump and narendra modiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 10, 2026 | 9:24 PM
Share

America Tariffs : अमेरिकेच्या सीनेटमध्ये रशियाच्या तेल निर्यातीवर निर्बंध आणण्यासाठी एक विधेयक आणले आहे. या विधेयकामुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘लिंडसे ओ. ग्राहम सॅंक्शनिंग रशिया अॅक्ट ऑफ 2026’ असे या विधेयकाचे नाव असून त्याला सीनेटमध्ये 86 विरुद्ध 11 मतांनी मंजुरी मिळाली आहे. या विधेयकात रशियन तेल आणि गॅसचे मोठ्या प्रमाणावर आयातदार असलेल्या देशांना लक्ष्य करण्याची तरतूद आहे. भारत आणि चीनसह पाच देशांचा यामध्ये समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

विधेयकाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संबंधित देशांवर 100 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा अधिकार मिळू शकतो. मात्र, विधेयकाला अद्याप अमेरिकन प्रतिनिधीगृहाची मंजुरी मिळणे बाकी असून त्यानंतर पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

रशियाकडून ऊर्जा आयात करणाऱ्या देशांवर कारवाई?

या प्रस्तावावर भारतीय इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट आणि फंड मॅनेजर हर्ष गुप्ता मधुसूदन यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. रशियाकडून ऊर्जा आयात करणाऱ्या देशांवर कारवाई करण्याची ही भूमिका प्रत्यक्षात भारतासाठी अधिक त्रासदायक ठरू शकते, असा त्यांचा दावा आहे. रशियाशी व्यापार करणाऱ्या इतर देशांच्या तुलनेत भारतालाच लक्ष्य का केले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केल्यास…

भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात कमी केली तर त्याचे परिणाम केवळ भारतापुरते मर्यादित राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांच्या मते, भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केल्यास जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात. दुसरीकडे, भारताची जागा चीन घेऊन रशियाकडून अधिक प्रमाणात तेल आयात करू शकतो.

हे विधेयक भारत-अमेरिका संबंधांसाठीही महत्त्वाचे

दरम्यान, हे विधेयक भारत-अमेरिका संबंधांसाठीही महत्त्वाचे ठरू शकते. त्यामुळे अमेरिकेच्या या निर्णयाचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर, अर्थव्यवस्थेवर आणि दोन्ही देशांच्या व्यापार संबंधांवर काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास