Asia Cup 2022 : पाकिस्तानी बॅटसमनने, अफगाणच्या बॉलरवर बॅट उगारली , क्रिकेटच्या मैदानात वातावरण तापलं

त्याचबरोबर काल झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांनी पाकिस्तानच्या प्रेक्षकांना मारहाण केल्याचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे.

Asia Cup 2022 : पाकिस्तानी बॅटसमनने, अफगाणच्या बॉलरवर बॅट उगारली , क्रिकेटच्या मैदानात वातावरण तापलं
शोएब अख्तरचा अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांना सल्ला
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Sep 08, 2022 | 12:25 PM

आशिया चषक (Asia Cup) सुरु झाल्यापासून खेळाडूंमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. कालच्या अफगाणिस्तान (Afganistan) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) झालेल्या रोमहर्षक मॅचमध्ये खेळाडूंमध्ये असलेला संघर्ष दिसून आला. सुरुवातीला फलंदाजी करीत असताना अफगाणिस्तानची धावसंख्या जेमतेम झाली होती. परंतु नंतर पाकिस्तानच्या खेळाडूंना सुद्धा फलंदाजी करता आली. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंचा संघर्ष मैदानात पाहायला मिळाला. कालच्या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजाने अफगाणिस्तानच्या गोलंदाजाला बॅट दाखवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

नेमकं काय झालं

सामना कोण जिंकेल अशा स्थितीत असताना 19 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर गोलंदाज फरीद अहमदच्या 5 व्या चेंडूवर पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली चुकीचा फटका मारल्याने झेलबाद झाला. त्यावेळी फरीद अहमद याने जोरदार आनंद व्यक्त केला. त्यानंतर संतापलेल्या आसिफ अलीने गोलंदाजाला धक्का दिला आणि बॅट दाखवल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ज्यावेळी आसिफ अलीने बॅट उचलली तेव्हा अफगाणिस्तानच्या इतर खेळाडूंनी मध्यभागी येऊन त्याला रोखले.

शोएब अख्तरचा अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांना सल्ला

त्याचबरोबर काल झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांनी पाकिस्तानच्या प्रेक्षकांना मारहाण केल्याचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तर संतप्त झाला आहे. त्याने कालच्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून तुम्ही खेळाला खेळ म्हणून पाहा असा देखील सल्ला अफगाण प्रेक्षकांना दिला आहे.