AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 | आरारा खतरनाक! राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू

राजस्थानच्या जोफ्रा आर्चरने अवघ्या 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. (Rajasthan Royals Jofra Archer Delivered Fastest Bowl)

IPL 2020 | आरारा खतरनाक! राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा विक्रम, तब्बल 151 किमीच्या स्पीडने टाकला चेंडू
| Updated on: Oct 01, 2020 | 1:27 AM
Share

दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) 12 वा सामना 30 सप्टेंबरला खेळण्यात आला. हा 12 वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने सलग 2 सामने जिंकणाऱ्या राजस्थानचा 37 धावांनी एकतर्फी पराभव केला. या सामन्यात जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) 4 ओव्हर टाकल्या. यात त्याने 4. 50 च्या इकोनॉमीने अवघ्या 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. यात सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार दिनेश कार्तिकला बाद केले. जोफ्राने आपल्या बोलिंग दरम्यान एक विक्रम केला आहे. (Rajasthan Royals Jofra Archer Delivered Fastest Bowl)

काय आहे विक्रम?

जोफ्रा आर्चरने सामन्याच्या पहिल्या डावात हा विक्रम केला. कोलकाता विरुद्ध बोलिंग करताना आर्चरने 13 व्या ओव्हरमधील चौथा बोल चक्क ताशी  150 किमीपेक्षा अधिक वेगाने टाकला. आर्चरने हा बोल ताशी 151. 4 किलोमीटर  वेगाने टाकला. यासह आर्चरने आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली आहे. आर्चर आयपीएल 2020 मध्ये सर्वात वेगवान बोल टाकणारा बॉलर ठरला. याआधी जोफ्रा आर्चरने 2018 मध्येही अशीच कामगिरी केली होती. जोफ्राने 2018 मध्ये ताशी 152. 39  किमी वेगाने बोल टाकला होता.

दरम्यान याआधी 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत जोफ्रा आर्चरने असाच वेगवान बोल टाकला होता. आर्चरने बांग्लादेश विरुद्धातील सामन्यात चक्क ताशी 153 किमीच्या वेगाने बॉल टाकला होता.

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात वेगाने बोल टाकण्याचा विक्रम बोलर डेल स्टेनच्या (Dale Steyn) नावावर आहे. स्टेनने डेक्कन चार्जर्सकडून खेळताना ताशी  154. 40 किमी इतक्या वेगाने बोल टाकण्याचा कारनामा केला होता.

जोफ्रा आर्चरची आयपीएल कारकिर्द

जोफ्रा आर्चरने 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं. आर्चरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 24 सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 29 विकेट्स घेतल्या आहेत. 3/15 ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. तसेच जोफ्राने बॅटिंगद्वारे 128 धावा केल्या होत्या. 27 नाबाद ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.

संबंधित बातम्या :

IPL 2020, RR vs KKR : कोलकाता जितबो रे…, राजस्थानवर 37 धावांनी मात

IPL 2020 | “इट शूड बी असा पाय पडला पाहिजे”, श्रीरामपूरच्या झहीरचे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना मराठीत धडे

(Rajasthan Royals Jofra Archer Delivered Fastest Bowl)

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ