Rishabh Pant : ऋषभ पंतची थक्क करणारी कीपींग, चित्त्यासारखी झेप, काम तमाम, एकदा हा Video बघा

Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्स विरुद्ध कमालीची गोलंदाजी केली. फिल्डिंगमध्ये दम दाखवला. खासकरुन दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतने कमालीची विकेटकिपींग केली. उत्तम कॅचसह पंतने सुंदर स्टम्पिंग केली.

Rishabh Pant : ऋषभ पंतची थक्क करणारी कीपींग, चित्त्यासारखी झेप, काम तमाम, एकदा हा Video बघा
Rishabh Pant Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 9:44 AM

IPL 2024 च्या 32 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतने आपल्या उत्तम विकेटकीपिंगने सर्वांच मन जिंकलं. ऋषभ पंतने गुजरात टायटन्स विरुद्ध एक जबरदस्त कॅच घेतली. सोबत दोन कमालीच्या स्टम्पिंगही केल्या. अहमदाबादच्या पीचवर खेळताना फलंदाजांना अडचणी येत होत्या. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने उत्तम फिल्डिंग करुन गुजरातच्या अडचणीत भर घातली. ऋषभ पंतने डेविड मिलरची जबरदस्त कॅच घेतली. त्यानंतर अभिनव मनोहर आणि शाहरुख खानची स्टम्पिंग केली.

ऋषभ पंतने 5 व्या ओव्हरमध्ये इशांत शर्माच्या गोलंदाजीवर जबरदस्त कॅच पकडली. इशांतचा चेंडू मिलरच्या बॅटच्या आतल्या बाजूला लागला. त्यानंतर चेंडू पॅडला लागून दिशा बदलून ऑफ स्टम्पच्या बाहेर गेला. पण पंतने कमालीची डाइवर मारुन कॅच पकडली. ही कॅच यासाठी खास आहे, कारण चेंडू दिशा बदलत होता. तो पकडण्यासाठी चांगल्या नजरेसह वेगवान हालचाल आवश्यक होती. पंत बराच काळ मैदानापासून लांब होता. तो या टुर्नामेंटमधून पुनरागमन करतोय. त्याने ही कॅच पकडून आपला फिटनेस सिद्ध केला.

क्लासिक स्टम्पिंग

डेविड मिलरची कॅच घेतल्यानंतर ऋषभ पंतने आणखी 2 स्टम्पिंग्स सुद्धा केल्या. 9 व्या ओव्हरमध्ये ट्रिस्टन स्टब्सच्या चेंडूवर ऋषभने अभिनव मनोहरच स्टम्पिंग केलं. अभिनवने पुढे येऊन स्टब्सच्या चेंडूवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. त्याचे पाय क्रीज बाहेर होते. संधी मिळताच पंतने बेल्स उडवल्या. त्यानंतर स्टब्सने शाहरुख खानला लेग स्टम्पच्या बाहेर वाइड चेंडू टाकला. शाहरुखने पाय उचलताच पंतने त्याला स्टम्प आऊट केलं.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.