भयानक ! पत्नीशी फोनवर बोलत होता, आई मध्येच बोलली; संतापलेल्या मुलाने आईवर सुराच चालवला

राग... माणसाचा सर्वात मोठा शत्रू ! एखाद्याला राग आला आणि तो डोक्यात गेला तर ती व्यक्ती काय करेल याचा काहीच नेम नाही. अशा वेळी रागाच्या भरात अशी कृती होऊन बसते की आयुष्यभर त्याचा पश्चाताप करावा लागू शकतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशाच रागामुळे एका मुलाने त्याच्या आईसोबत असे काही कृत्य केले ज्यामुळे एक जीव हकनाक गेला

भयानक ! पत्नीशी फोनवर बोलत होता, आई मध्येच बोलली; संतापलेल्या मुलाने आईवर सुराच चालवला
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 9:47 AM

राग… माणसाचा सर्वात मोठा शत्रू ! एखाद्याला राग आला आणि तो डोक्यात गेला तर ती व्यक्ती काय करेल याचा काहीच नेम नाही. अशा वेळी रागाच्या भरात अशी कृती होऊन बसते की आयुष्यभर त्याचा पश्चाताप करावा लागू शकतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशाच रागामुळे एका मुलाने त्याच्या आईसोबत असे काही कृत्य केले ज्यामुळे एक जीव हकनाक गेला आणि त्याचं आयुष्यही उद्ध्वस्त झालं. रागातून मुलाने जन्मदात्या आईचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्राकर कोल्हापूरमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. मोबाईलवर बोलताना आई मध्येच बोलल्याचा मुलाला रागा आला आणि त्याने त्याच्या आईचाच जीव घेतला. या घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला बेड्या ठोकत अटक केली.

कौटुंबिक वादातून आईलाच संपवलं

मुलगा आईच्या जीवावर उठल्याची ही धक्कादायक घटना कोल्हापूरच्या साळोखे पार्क येथे घडली. कौटुंबिक वादातून मुलाने आईचा जीव घेतला. सादिक मुजावर असे आरोपीचे नाव असून शहनाज मुजावर असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सादिक मुजावर याचे याचे त्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत अनेक वाद होते. त्यामुळे कोल्हापूर पोलिस स्थानकात त्याच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल आहेत. आई आणि बहिणीसोबत देखील अनेक वेळा त्याचे वाद झाले.

काल रात्री सादिक हा त्याच्या पत्नीसोबत बोलत होता. तेवढ्यात त्याची आई, शहनाज ही मध्येच काहीतरी बोलली. पत्नीसोबत बोलत असताना आई मध्येच बोलल्याने सादिक तिच्याशी वाद घालू लागला.  माझ्या पत्नीशी मी बोलत असताना तू मघ्येच का बोलली? असा जाब विचारत तो आईशी भांडू लागला. हे भांडण इतकं टोकाला गेलं की संतापलेल्या सादिकने आईवर सुऱ्याने थेट हल्ला केला. वादात सादिकने बेसावध असलेल्या आईच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर सुऱ्याने वार केले.

गंभीर जखमी झालेल्या त्याच्या आईचा प्रचंड रक्तस्त्रावामुळे जागीच मृत्यू झाला.  या हत्याकांडाची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून शहनाज यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी सादिक याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Non Stop LIVE Update
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत.
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?.
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल.
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप.