AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण जिंकणार रे कोण जिंकणार? शरद पवारांच्या ‘या’ उमेदवारासाठी तब्बल 30 लाखांच्या 11 बुलेटची पैज

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे पाचही टप्पे पूर्ण झाले आहेत. आता फक्त निकालाची वाट बघायची आहे. येत्या 4 जूनला निकाल समोर येणार आहे. पण त्याआधीच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात एका मतदारसंघात तर शरद पवार यांच्या उमेदवारासाठी तब्बल 30 लाखांच्या 11 बुलेट गाड्यांची पैज लावण्यात आली आहे.

कोण जिंकणार रे कोण जिंकणार? शरद पवारांच्या 'या' उमेदवारासाठी  तब्बल 30 लाखांच्या 11 बुलेटची पैज
शरद पवारांच्या उमेदवारासाठी तब्बल 30 लाखांच्या 11 बुलेटची पैज
| Updated on: May 21, 2024 | 3:44 PM
Share

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा नुकताच पार पडला असून, लोकसभा निवडणुकीत विजयी कोण होणार? याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे. माढा लोकसभेत चुरशीची लढत झाली. असे असताना मात्र माढ्याचा खासदार कोण होणार? तुतारी वाजणार की कमळ फुलणार? याचे आडाखे बांधले जात आहेत. पक्षाचे पदाधिकारी, उमेदवारांचे समर्थक आपलाच उमेदवार निवडून येणार असे दावे करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या समर्थक बंधूंनी चक्क 11 बुलेटची पैज लावली आहे.

मोहिते-पाटील यांचे समर्थक तथा माढा तालुक्यातील योगेश पाटील आणि नीलेश पाटील या युवा शेतकरी भावंडांनी माढ्यातून तुतारीच निवडून येणार, असा आत्मविश्वास घेऊन भाजपसह समर्थकांना 11 बुलेटच्या पैजेचे चॅलेंज उभं केलं आहे. हे चॅलेंज भाजपसह रणजितसिंह निंबाळकरांच्या एका समर्थकांकडून स्वीकारण्यात आल्याचीदेखील माहिती समोर आली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील तर भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर या दोघांमध्ये राजकीय लढत झाली होती. निवडणूक निकालावर सोलापुरात 1 लाखाची पैज लागलेली आहे. अशातच आता माढा मतदारसंघासाठी देखील 11 बुलेट गाडींचे चॅलेंज लावण्यात आलं आहे. एका बुलेटची किंमत पावणे 3 लाख आहे. त्यामुळे 11 बुलेटची किंमत 30 लाख 25 हजार इतकी आहे.

निंबाळकर समर्थकाने स्वीकारलं चॅलेंज

योगेश पाटील आणि निलेश पाटील या दोन्ही भावांनी अकरा बुलेटचे दिलेले चॅलेंज निंबाळकर समर्थकाने स्वीकारले आहे. माढ्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील निवडून येणार, असा दावा दोन्ही भावांनी केला होता. मात्र माढ्यातून भाजपचे रणजीतसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणार, असा दावा आता फलटणचे माजी नगरसेवक आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर समर्थक अनुप शहा यांनी केला आहे.

योगेश पाटील आणि निलेश पाटील या दोन्ही भावांनी पहिल्यांदा बुलेट शोरूमला 11 बुलेटचे पैसे भरूनच चॅलेंज लावावे, असे आवाहन अनुप शहा यांनी केले आहे. आम्ही देखील 11 बुलेटचे पैसे भरायला लगेच तयार आहोत. पंढरपुरात येऊन बुलेट शोरूमला पैसे भरा आणि पावती पाठवा आम्ही देखील लगेच पैसे भरायला तयार असल्याचे अनुप शहा यांनी सांगितले.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.