बांगलादेशात मोठा बॉम्बस्फोट, विद्यापीठाची तोडफोड, पुन्हा मोठा हिंसाचार, एकाचा मृत्यू तर..
मागील काही दिवसांपासून बांगलादेशात मोठा हिंसाचार बघायला मिळतोय. बांगला पेटला आहे. मात्र, बांगलादेशातील परिस्थिती काही नियंत्रणात येत नाहीये. थेट भारतीय दूतावासाच्या कार्यालयालाही टार्गेट केले जातंय.

बांगलादेशात हिंसाचार सुरू असून भारतीय दूतावासाच्या कार्यालयालाही टार्गेट करण्यात आले. हिंदू लोकांवर होणाऱ्या हल्ल्यानंतर भारतातही वातावरण तापताना दिसले. थेट दिल्लीतील बांगलादेश दूतावास कार्यालयाबाहेरच लोकांनी आंदोलने केली. फेब्रुवारीमध्ये निवडणुका असतानाच बांगलादेशातील परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा बांगलादेशात हिंसाचार सुरू आहे. बांगलादेशची राजधानी ढाका, बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे हद्दपार नेते तारिक रहमान यांच्या संभाव्य परतण्यापूर्वी पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला. मोगबाजार परिसरात बॉम्बस्फोट झाला असून या स्फोटामध्ये 21 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हा तरूण नाश्ता आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र, दुर्देवी प्रकारे या स्फोटात त्याचा मृत्यू झाला. राजधानीतील परिस्थिती बांगलादेशासाठी चिंतेचा विषय बनली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी 7.10 वाजता मोगबाजार फ्लायओव्हरवरून रस्त्यावर एक शक्तिशाली बॉम्ब हल्लेखोरांनी फेकला. तो बॉम्ब रस्त्यावरून चालत नाश्ता आणण्याठी गेलेल्या तरुणाच्या डोक्याला लागला. ज्यानंतर त्याचा जागीच जीव गेला आणि परिसरात मोठी खळबळ पसरली. लोक भीतीने पळताना दिसली. काही जण लपूनही बसली. प्रचंड तणावाताचे वातावरण सध्या बांगलादेशात आहे.
मृत 21 वर्षीय तरूण मोगबाजार परिसरातील एका ऑटोमोबाइल ॲक्सेसरीजच्या दुकानात काम करत होता. त्यावेळी तो नाश्ता घेण्यासाठी जात होता, त्यावेळीच ही घटना घडली. तारिक रहमान ढाकामध्ये परतण्याची शक्यता आहे. यादरम्यानच अशा गोष्टी बांगलादेशात घडवून आणल्या जात आहेत. 2026 मध्ये बांगलादेशात निवडणुका आहेत. तारिक रहमान हे माजी राष्ट्राध्यक्ष झियाउर रहमान आणि माजी पंतप्रधान खालेदा झिया यांचे पुत्र आहेत.
गेल्या 15 वर्षांपासून निर्वासित जीवन जगत आहेत. आगामी निवडणुकीच्या काळात ते ढाकाला परतणार आहेत. मात्र, तारिक रहमान कडक सुरक्षेत असतील, सध्या ज्याप्रकारे बांगलादेशात वातावरण आहे, त्यामुळे काहीही होऊ शकते. रमना विभागाचे पोलीस उपायुक्त मसूद आलम यांनी या स्फोटाबद्दल बोलताना सांगितले की, तो एक कॉकटेल बॉम्ब होता. हल्लेखोराची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हेच नाही तर विद्यापीठाचीही तोडफोड करण्यात आली आहे.
