बांगलादेशाचा होणार शेवट…? थेट धरले या देशाचे पाय, विनाशाकडे…
बांगलादेशात हिंसाचार सुरू आहे. भारतीय दूतावासाच्या कार्यालयाला टार्गेट करत हल्ला करण्यात आला. मुहम्मद युनूस यांच्या हातातून बांगलादेशमधील परिस्थिती जात आहे. त्यामध्येच आता मोठी खळबळ उडाली.

बांगलादेशमध्ये प्रचंड अशांतता आहे. मोठा हिंसाचार सुरू असून हिंदू लोकांना टार्गेट केले जातंय. हेच नाही तर भारतीय दूतावासांच्या कार्यालयाला टार्गेट करत दगडफेक करण्यात आली. त्यानंतर भारताने मोठा निर्णय घेत दूतावास कार्यालयच बंद केले. बांगलादेश सध्या हिंसाचार आणि अशांततेच्या काळातून जात आहे. नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्याही नियंत्रणाबाहेर बांगलादेश गेला आहे. सध्याची परिस्थिती बघता बांगलादेशात स्थिर सरकार येईल, अशी परिस्थिती अजिबातच दिसत नाहीये. याबाबतची कोणतीही चिन्हे सध्या नाहीत. बांगलादेशातील परिस्थितीदरम्यान अमेरिकेचा प्रचंड दबाव मुहम्मद युनूस यांच्यावर आहे. काहीही करून त्यांना देशातील परिस्थिती हाताळता येत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, मुहम्मद युनूस यांनी भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्याशी फोनवर संवाद साधला.
भारतातील अमेरिकेच्या दूतावासांना त्यांनी सांगितले की, बांगलादेशातील निवडणुका लवकरच होतील आणि सर्वकाही व्यवस्थित होईल. बांगलादेशच्या सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी सर्जियो गोर यांना फोन केला. त्यांनी सर्जियो गोर यांना सांगितले की, सध्या निवडणुकीची तयारी सुरू असून 12 फेब्रुवारीला निवडणुका होतील. युनूस यांनी माहिती दिली की, संध्याकाळी 7.30 च्या सुमारास त्यांनी सर्जियो गोर यांना फोन कॉल केला आणि दोघांमधील संवाद अर्धा तास सुरू होता.
बांगलादेश-अमेरिका व्यापार, शुल्क करार आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. जे प्रयत्न केली जात आहेत, त्याकरिता आपले काैतुक गोर यांनी केल्याचे युनूस यांनी सांगितले. हेच नाही तर अमेरिकेने बांगलादेशी उत्पादनांवरील परस्पर शुल्क 20 टक्क्यांपर्यंत कमी केल्याचाही दावा त्यांनी केला. सध्या बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार असेल, तर ते केवळ अमेरिकेच्या पाठिंब्यामुळेच आहे.
अमेरिका थेटपणे आता बांगलादेशमध्ये हस्तक्षेप करताना दिसत आहे. बांगलादेश ट्रम्प प्रशासनाची मर्जी टिकवून ठेवण्यासाठी अमेरिकेला खूश करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. अमेरिकेच्या या शरणागतीचा फायदा युनूस यांनाही झाला आहे. अमेरिकेने खूप कमी टॅरिफ बांगलादेशवर लावला. भारताच्या आजूबाजुच्या देशांना अमेरिका हाताशी धरत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळतंय.
