
दुलीप ट्रॉफी टुर्नामेंटच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये वेस्ट झोनचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने कमाल केली. त्याने पहिल्या इनिंगमध्ये शानदार शतक झळकावलं. ऋतुराज गायकवाडने आपला क्लास दाखवला. 13 चौकारांच्या मदतीने त्याने शतक ठोकलं. गायकवाडच शतक खास आहे. कारण सेंट्रल झोन विरुद्ध वेस्ट झोनने आपले दोन चांगले फलंदाज लवकर गमावले होते. यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर बद्दल बोलतोय. दोघे पहिल्या इनिंगमध्ये फेल गेले. जैस्वालने फक्त चार धावा केल्या. श्रेयस अय्यर सेट झाल्यानंतर 25 रन्स करुन आऊट झाला.
ऋतुराज गायकवाडने दुलीप ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये आपल्या स्टाइलमध्ये बॅटिंग केली. चौकार जडलेच पण स्ट्राइकही रोटेट केली. कुठलाही धोका न पत्करता गायकवाडने 70 च्या स्ट्राइक रेटने सेंच्युरी झळकवली. फर्स्ट क्लास करिअरमधील गायकवाडच हे आठव शतक आहे. गायकवाड सोबत श्रेयस अय्यरही चांगली फलंदाजी करत होता. त्याने चार चौकार मारलेले. पण वेगाने धावा बनवण्याच्या प्रयत्नात 28 चेंडूत 25 धावा करुन तो बाद झाला. ऋतुराज खेळपट्टीवर टिकून राहिला. लंचनंतर त्याने आपली सेंच्युरी पूर्ण केली.
जैस्वाल अवघे 3 चेंडू खेळून पॅव्हेलियनमध्ये
डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल इंग्लंड दौऱ्यानंतर पहिल्यांदा मैदानावर दिसला. जैस्वाल अवघे 3 चेंडू खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. जैस्वालला डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदने LBW आऊट केलं. हार्विक देसाईला दीपक चाहरने बाद केलं. तो फक्त एक रन्स करु शकला.
वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीजसाठी दावेदार ठरु शकतो
त्यानंतर आलेल्या आर्या देसाईने ऋतुराज सोबत मिळून 82 रन्सची पार्टनरशिप केली. त्यामुळे वेस्ट झोनची टीम सुरुवातीच्या धक्क्यांमधून सावरली. एकवेळ ऋतुराज गायकवाडकडे टीम इंडियाच भविष्य म्हणून पाहिलं जात होतं. पण आता तो टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये नाहीय. ऋतुराज गायकवाडने अशी फलंदाजी सुरु ठेवली, तर तो वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट सीरीजसाठी दावेदार ठरु शकतो. ऋतुराज गायकवाडने एकवेळ त्याच्याकडून अपेक्षा भरपूर वाढवल्या होत्या. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याने सातत्याने धावा केल्या आहेत.