Cricket : क्रिकेटच्या करिअरमध्ये रचला इतिहास, ज्या दिवशी क्रिकेटमध्ये ठेवले पाऊल, त्याचदिवशी निवृत्ती

| Updated on: Nov 15, 2022 | 3:12 PM

ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले, त्याचदिवशी निवृत्ती घेतली, 34,357 धावा केल्या...

Cricket : क्रिकेटच्या करिअरमध्ये रचला इतिहास, ज्या दिवशी क्रिकेटमध्ये ठेवले पाऊल, त्याचदिवशी निवृत्ती
sachin tendulkar
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : क्रिकेट (Cricket) हा खेळ जगभरात खेळला जातो, क्रिकेटचे चाहते सुद्धा जगभरात आहेत. ऑस्ट्रेलियात नुकतीच विश्वचषक स्पर्धा पार पडली. ज्या दिवशी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं, त्याचं दिवशी तब्बल 24 वर्षानंतर अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करत निवृत्ती घेतली. त्या खेळाडूचं नाव सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू तेंडूलकरच्या नावावर आजही अनेक रेकॉर्ड (Record) आहेत. टीम इंडियाचा त्यावेळेचा आधारस्तंभ खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे.

9 वर्षापुर्वी आजच्या दिवशी सचिन तेंडूलकरने 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 15 नोव्हेंबर 1989 ला सचिनने क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं. दोन दशकाहून अधिककाळ क्रिकेट खेळल्यानंतर 15 नोव्हेंबर 2013 साली निवृत्ती घेतली.

हे सुद्धा वाचा

9 वर्षापुर्वी सचिनने आजच्या दिवशी निवृत्ती घेतली होती. त्याची एक पोस्ट बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये तेंडूलकरचा सुरुवातीचा आणि निवृत्तीचा फोटो शेअर केला आहे.

सचिनचं 24 वर्षांचं करिअर

  1. 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
  2. 34 हजारांपेक्षा जास्त धावा काढल्या
  3. सचिनने शतकांचं शतक लगावलं
  4. सचिनच्या शतकांच्या आसपास अद्याप एकही खेळाडू नाही
  5. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिक धावा काढण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे
  6. आयपीएलमध्ये 78 सामने खेळले
  7. आयपीएलमध्ये 2334 धावा काढल्या