AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांवर रुग्णालयात उपचार सुरू, डॉक्टरांची पहिली प्रतिक्रिया समोर, मोठी हेल्थ अपडेट

शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना आज बारामतीवरून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

शरद पवारांवर रुग्णालयात उपचार सुरू, डॉक्टरांची पहिली प्रतिक्रिया समोर, मोठी हेल्थ अपडेट
sharad pawar Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 09, 2026 | 5:54 PM
Share

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना बारामतीवरून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  शरद पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार आज सकाळीच शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती, त्यांना सर्दी, खोकला आणि तापेचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांच्या बारामतीमधील निवासस्थानी सकाळी डॉक्टराच्या पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात आली होती, मात्र त्यानंतर त्रास वाढल्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांचं पथक त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं, त्यांची तपासणी केली आणि त्यांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान शरद पवार यांच्यावर  रुग्णालयात उपचार सुरू असून,  त्यांच्या प्रकृतीबाबत डॉ. अभिजित लोढा यांनी माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले डॉ. लोढा? 

शरद पवार यांच्या छातीमध्ये कफ झालेला आहे, छातीमध्ये थोडसं कजेक्शन आहे. योग्य त्या तपासण्या करण्यात येणार आहेत, आता सध्या शरद पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत, सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थीर आहे. तपासण्यांचा रिपोर्ट आल्यानंतर जर उपचारामध्ये काही बदल करायचा असेल तर तसा बदल करू, त्यांना दोन – तीन दिवसांपासून खोकल्याचा त्रास आहे. पुढच्या दोन ते तीन तासांमध्ये रिपोर्ट मिळेल, असं लोढा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी देखील कार्यकर्त्यांना रुग्णालयात न येण्याचं आवाहन केलं आहे. ‘मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, की आपण हॉस्पिटलला आजिबात येऊ नका, इथे सर्व पेशंट आहेत, आणि आता डॉक्टरांनी जसं सांगितलं शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. मी स्वत: चर्चा केली आहे, त्यामुळे टेन्शन घेण्याच कारण नाहीये. गेल्या दहा -बारा दिवसांपासून असलेला ताण, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की गेल्या दहा -बारा दिवसांपासून पवार साहेब अनेकांना भेटत होते, त्यामुळे थोडासा ताण आला आहे. छातीमध्ये थोडासा कफ झाला आहे, आता थोड्यावेळात रिपोर्ट येतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?