AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपच्या आमदार मैथिली ठाकूर यांना मोठा धक्का, तडकाफडकी मोठी कारवाई

मोठी बातमी समोर येत आहे, मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्राप्त तक्रारीनंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मोठी कारवाई करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे मैथिली ठाकूर यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

मोठी बातमी! भाजपच्या आमदार मैथिली ठाकूर यांना मोठा धक्का, तडकाफडकी मोठी कारवाई
Maithili ThakurImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 8:52 PM
Share

अलीनगरच्या भाजपा आमदार मैथिली ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. मैथिली ठाकूर आणि त्यांचे वडील रमेश ठाकूर यांच्याशी सबंधित जमीन वादावर प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. तारडीह तालुक्यातील पोखरभिंडा गावातील ग्रामस्थांनी या संदर्भात तक्रार केली होती.सरकारी रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आल्याची ही तक्रार होती. ग्रामस्थांनी तक्रार करताच प्रशासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तक्रार प्राप्त होताच अधिकार्‍यांचं एक पथक घटनास्थळी तातडीने रवाना झालं, सरकारी रस्त्याचं मोजमाप करण्यात आलं, यादरम्यान सरकारी रस्त्यावर जेवढं अतिक्रमण करण्यात आलं होतं, ते सर्व हटवण्यात आलं आहे.

ग्रामस्थांनी या संदर्भात तक्रार केली होती. तक्रार प्राप्त होताच डीसीएलआर अजय कुमार आणि सीओ अलोक कुमार हे आपल्या काही अधिकाऱ्यांसह पोखरभिंडा गावात पोहोचले आणि त्यांनी तेथील सरकारी रस्त्याचं मोजमाप केलं. अतिक्रमण झाल्याचं आढळून आल्यानंतर जिथे अतिक्रमण झालं होतं, तेवढा भाग रिकामा करण्यात आला, तसेच हे सर्व अतिक्रमण देखील तातडीने हटवण्यात आलं आहे. ग्रामस्थांनी या संदर्भात एक अर्ज केला होता. सरकारी रस्ता, काही खासगी जमीन, ग्राम देवता तिवारी बाबा स्थान, राधाकृष्ण मंदिर आणि नाल्यासाठी असलेल्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचं या अर्जामध्ये ग्रामस्थांनी म्हटलं होतं.

दरम्यान त्यानंतर ग्रामस्थांच्या तक्रारीची गंभीर दखल प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे. याबाबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तक्रारीनंतर जमिनीचं मोजमाप करण्यात आलं. जिथे-जिथे अतिक्रमण झालं होतं, त्या सर्व ठिकाणंचं अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. इतर ग्रामस्थांच्या अतिक्रमणासंदर्भातील तक्रारी आहे, त्या सर्वांना पुरावे घेऊन सोमवारी कार्यालयात बोलवण्यात आलं आहे, तिथेच त्यांच्या दस्ताऐवजाची तपासणी होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान या सर्व प्रकारणावर आता आमदार मैथिली ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आपल्यावरील आणि वडिलांवरील सर्व आरोप फेटाळले आहेत. मी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या प्रकरणाशी सबंधित काही पोस्ट पाहत आहे, आरोप होत आहे. मात्र हे सर्व आरोप तथ्यहीन आहेत. माझ्या कुटुंबावर खोटे आरोप होत आहेत. हे सर्व पाहून आपल्याला दु:ख होत असल्याचं मैथिली ठाकूर यांनी म्हटलं आहे. जर तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते तुम्ही सादर केले पाहिजेत, असंही यावेळी ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'