AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळचा नाश्ता असो वा इव्हनिंग स्नॅक्स, बनवा क्रिस्पी बटाटा व्हेज कटलेट; खूप सोपी आहे रेसिपी

सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी बटाटे आणि भाज्यांपासून तयार केलेले आलू व्हेज कटलेट उत्तम पर्याय ठरू शकतात. चला तर मग जाणून घ्या सोपी रेसिपी.

सकाळचा नाश्ता असो वा इव्हनिंग स्नॅक्स, बनवा क्रिस्पी बटाटा व्हेज कटलेट; खूप सोपी आहे रेसिपी
बटाटा व्हेज कटलेटImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Nov 12, 2026 | 9:19 PM
Share

काही वेळा नाश्त्याला नेहमीपेक्षा वेगळे आणि चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा होते. अशावेळी बटाटे आणि विविध भाज्यांपासून तयार केलेले क्रिस्पी बटाटा व्हेज कटलेट उत्तम पर्याय ठरू शकतात. बाहेरून खमंग आणि आतून मऊ असणारे हे कटलेट सकाळच्या नाश्त्यासोबतच संध्याकाळच्या चहाच्या वेळीही खायला छान लागतात. विशेष म्हणजे घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून ही रेसिपी तयार करता येते. चला तर मग, जाणून घेऊया बटाटा व्हेज कटलेट बनवण्याची सोपी पद्धत.

बटाटा व्हेज कटलेट बनवण्यासाठी साहित्य

– ३ ते ४ उकडलेले बटाटे – १ मध्यम आकाराचा कांदा – १ मध्यम आकाराची सिमला मिरची – १ मध्यम आकाराचे गाजर – अर्धा कप मटार – ३ ते ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या – १ इंच आले बारीक चिरलेले – १२ ते १५ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या – २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर – २ चमचे भाजलेले शेंगदाणे – १ मोठा कप ब्रेड क्रम्ब्स – अर्धा चमचा लाल तिखट – अर्धा चमचा धणेपूड – १ चमचा गरम मसाला – १ चमचा चाट मसाला – अर्धा चमचा जिरेपूड – १ चमचा कसुरी मेथी – १ चमचा जिरे – १/३ चमचा हिंग – ३ ते ४ चमचे तेल – १ चमचा मीठ घोळ तयार करण्यासाठी साहित्य – अर्धा कप मैदा – अर्धा कप कॉर्नफ्लोअर – १/३ चमचा लाल तिखट – अर्धा चमचा मीठ – १ कप पाणी

बटाटा व्हेज कटलेट बनवण्याची विधी

सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या. त्यांचे साल काढा. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेले आले-लसूण घालून दोन मिनिटे परतून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, गाजर आणि मटार घालून तीन ते चार मिनिटे शिजवा. आता त्यात सर्व मसाले आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार मसाल्यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करून घाला. सर्व मिश्रण एकजीव करून सहा ते सात मिनिटे शिजवा. त्यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे, ब्रेड क्रम्ब्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा व्यवस्थित मिसळा. तयार मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या.

मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे कटलेटच्या आकाराचे गोळे तयार करा. आता एका भांड्यात मैदा, कॉर्न फ्लोअर, लाल तिखट, मीठ आणि पाणी घालून घोळ तयार करा. तयार केलेले कटलेट या घोळात बुडवून त्यावर कुस्करलेल्या शेवयांचे कोटिंग करा. एका खोल कढईत तेल गरम करून कटलेट सहा ते सात मिनिटे गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तयार झालेले कटलेट हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'