
भारताचा दिग्गज महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची मुलगी तिच्या मोहक सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिच्या सौंदर्याबद्दल क्रिकेट फॅन्स फिदा आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी ते उत्सुक असतात.

साराने एनिमल प्रिंट केलेला रॅप ड्रेस परिधान केला होता, तर तिच्या तोंडावर काळ्या रंगाचा मास्क होता आणि केस तिचे केस मोकळे होते. तिला पाहून पापाराझींनी तिचे 2 फोटो काढले पण सारा काहीच न बोलता निघून गेली.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत मात्र गोष्टींवर प्रतिबंध आहेत तसंच विनामास्क लोकांवर प्रशासन कारवाई करत आहे. अशा परिस्थितीत सगळी काळजी घेऊन सारा बाहेर जाताना दिसली.

मुंबईतील लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता दिली जात आहे. अशा परिस्थितीत महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसुद्धा शुक्रवारी मुंबईच्या वांद्रे येथील क्लिनिकच्या बाहेर दिसली. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सारा इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव असते. ती अनेकदा तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करते. सारा तेंडुलकर एक फॅशनिस्ट मानली जातो. तिच्या स्टायलिश अदा नेहमी इंस्टाग्रामवर पाहायला मिळतात.