AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar Pre Wedding Function : एक बाप म्हणून तुमच्याही डोळ्यात येईल टचकन पाणी… लाडक्या लेकाच्या लग्नापूर्वी सचिन तेंडुलकर झाला भावूक… जे बोलला त्याने…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या लेकाच्या लग्नाची तारीख जवळ येत चालली आहे. अर्जुन आणि सानिया चंडोकच्या प्री-वेडिंग फंक्शन्सना सुरूवात झाली आहे. त्यांचा एक सुंदर व्हिडीओही खूप व्हायरल झालाय.

Arjun Tendulkar Pre Wedding Function : एक बाप म्हणून तुमच्याही डोळ्यात येईल टचकन पाणी... लाडक्या लेकाच्या लग्नापूर्वी सचिन तेंडुलकर झाला भावूक... जे बोलला त्याने...
सचिन तेंडुलकर - अर्जुन - सानिया Image Credit source: social media
| Updated on: Feb 27, 2026 | 3:30 PM
Share

Sachin Tendulkar Emotional Speech : भारताचा दिग्गज क्रिकेटर, माजी खेळाडू सचिन तेंडुलकरच्या घरी लौकरच सनईचे सूर घुमणार आहेत. सचिन-अंजली यांचा लाडका लेक अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचं 5 मार्च रोजी लग्न होणार असून त्याच्या प्री वेडिंग फंक्शनलाही सुरूवात झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सानिया व अर्जुन यांचा साखरपुडा झाला. आता त्यांच्या लग्नाला अवघे काही दिवसच उरले असून नव्या सुनेला घरी आणण्यासाठी तेंडुलकर परिवार सज्ज आहे. दोघांच्या लग्नापूर्वी काही विधि, कार्यक्रमा पार पडले. त्यासाठीच सचिन तेंडुलकर हा पत्नी अंजलीसह आणि अर्जुन-सानिया अंबानी कुटुंबासोबत प्री-वेडिंगसाठी जामनगरला पोहोचला होता. त्यावेलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरला झाला असून अनेक फोटोही समोर आले आहेत. या फंक्शनदरम्यान अनेकांनी मनोगत व्यक्त केलं, मात्र लाडक्या लेकाच्या लग्नाआधीच सचिन खूप भावूक झाला होता. त्याचं इमोशल भाषणही सगळीकडे व्हायरल झालंय.

प्री वेडिंगदरम्यान अर्जुन- सानियाचे कुटुंबिय उपस्थित

तेंडुलकर कुटुंबाने पूजा करून प्री वेडिंग सेलिब्रेशन सुरू केलं, जामनगरमध्ये सगळे एकत्र जमले होते. याच ठिकाणी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचेही काही विधी झाले होते. आता अर्जुन सानियाच्या प्री वेडिंग सेलिब्रिशेनसाठी दोघांचेही संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. सचिन तेंडुलकरने यावेळी अंबानी कुटुंबाचे आभार मानले. “या जोडप्याला त्यांच्या पुढील प्रवासात आशीर्वाद देण्यासाठी आम्ही यापेक्षा चांगले ठिकाण आणि चांगले लोक निवडू शकलो नसतो. आम्हाला येथे आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.” असं तो म्हणाला.

सचिनचं इमोशनल स्पीच

यावेळी सचिनने अर्जुन तेंडुलकर आणि सानियाच्या प्रेमाबद्दलही सांगितले. तो म्हणाला, की जेव्हा मुलगा मुलीला घरी आणतो आणि तिची ओळख करून देतो तेव्हा वडिलांना समजतं की, आपला मुलगा तर आता मोठा झालाय. ते दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेत. अर्जुन मला तुझा अभिमान आहे. तुला अशी खास व्यक्ती सापडली आहे. तुझं तिच्यावर जितंक प्रेम आहे, तिचंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. सचिनच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑगस्टमध्ये साखरपुडा, मुंबईत पार पडणार लग्न

अर्जुन आणि सानिया चंडोकचा गेल्या वर्षी, ऑगस्ट 2025 मध्ये साखरपुडा झाला. आता पुढल्या महिन्यात, 5 मार्च रोजी ते मुंबईत लग्न करणार आहेत. सानिया चांडोक ही ग्रॅव्हिस ग्रुपचे चेअरमन रवी घई यांची नात आहे. ती अर्जुनची बहीण साराची जवळची मैत्रीण देखील आहे. सचिनच्या लेकाच्या लग्नाला देशातील तसेच जगभरातील प्रमुख व्यक्ती हजर राहतील, अशी अपेक्षा आहे. तेंडुलकर कुटुंबियांनी नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांनाही लग्नासाठी आमंत्रित केलं.

काय करते सानिया चंडोक ?

एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील असूनही, सान्या चांडोक प्रसिद्धीपासून दूर राहते. ती मुंबईतील Mr. Paws Pet Spa and Store LLP ची पार्टनर आणि संचालक आहे. हे पाळीव प्राण्यांचे स्किनकेअर, ग्रूमिंग आणि त्याच्याशी निगडीत प्रॉडक्ट्स पुरवतात. 2022 साली तिने याची सुरूवात केली होती.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?