Sachin Tendulkar : अब्दुल कादिरला लागोपाठ मारलेल्या सिक्स सर्वांच्या लक्षात राहिल्या पण..खुद्द सचिनकडून पहिल्या पाकिस्तान दौऱ्यातली ती इनिंग दुर्लक्षित राहिल्याची खंत

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट करिअरबद्दल चर्चा सुरु झाल्यानंतर पहिल्याच पाकिस्तान दौऱ्याच्या आठवणी सांगितल्या जातात. त्याने अब्दुल कादिरना मारलेल्या सिक्सबद्दल बोललं जातं. पण त्या सीरीजमध्ये सचिन एक महत्वाची इनिंग खेळला होता. त्याकडे दुर्लक्ष झालं, असं स्वत: सचिनलाही वाटतं.

Sachin Tendulkar : अब्दुल कादिरला लागोपाठ मारलेल्या सिक्स सर्वांच्या लक्षात राहिल्या पण..खुद्द सचिनकडून पहिल्या पाकिस्तान दौऱ्यातली ती इनिंग दुर्लक्षित राहिल्याची खंत
Sachin Tendulkar
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 16, 2026 | 11:01 PM

पाकिस्तान दौरा हा सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट करिअरमधील सर्वात महत्वाचा दौरा आहे. पाकिस्तान टूरपासून सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये डेब्यू केला. आजही सचिनच्या क्रिकेट करिअर बद्दल चर्चा सुरु झाली की, पाकिस्तान दौऱ्याबद्दल हमखास बोललं जातं. कारण बाळाची पावलं ज्या प्रमाणे पाळण्यात असताना दिसतात, तसचं सचिन तेंडुलकर हा किती मोठा खेळाडू होणार आहे हे त्याच्या करिअरमधील पाकिस्तान दौऱ्यात दिसलं होतं. त्या पाकिस्तान टूरमध्ये सचिनने पाकिस्तानचे महान लेग स्पिनर अब्दुल कादिर यांना पेशावरच्या सामन्यात लागोपाठ सिक्स मारले होते. तो एक प्रदर्शनीय सामना होता. पण सचिनचा तो परफॉर्मन्स आजही फॅन्सच्या चांगला लक्षात आहे. अब्दुल कादिर यांना लागोपाठ मारलेल्या षटकारांसाठी सचिन तेंडुलकरची आठवण काढली जाते. पण सचिनसाठी त्यापेक्षाही महत्वाची 57 धावांची खेळी होती.

MCA च्या शरद पवार क्रिकेट म्युझियममध्ये आज खास सचिनसाठी ‘बॅटोग्राफी’ या विभागाचं उद्घाटन करण्यात आलं. हा विभाग खास सचिन तेंडुलकरला समर्पित आहे. त्यावेळी सचिन बोलत होता. पेशावरमध्ये प्रदर्शनीय सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांसमोर केलेल्या प्रदर्शनाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं असं सचिन म्हणाला. भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या होती. मुश्ताक अहमदला काही सिक्स मारल्यानंतर अब्दुल कादिर यांनी सचिनला त्यांच्या बॉलिंगवर सिक्स मारण्याचं आव्हान केलं. त्यावेळी सचिनने अब्दुल कादिर यांच्या गोलंदाजीवर लागोपाठ सिक्स मारले.

Loading...

ती इनिंग जास्त महत्वाची वाटते

पण सचिनसाठी या प्रदर्शनापेक्षा पण त्याने चौथ्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये केलेलं प्रदर्शन जास्त महत्वाचं आहे. 34 धावांवर त्यावेळी भारताच्या चार विकेट गेल्या होत्या. पण सचिनने त्यावेळी 57 धावांची महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताला तो कसोटी सामना वाचवता आला. सचिनला सुद्धा अब्दुल कादिर यांना मारलेल्या षटकारांपेक्षा त्याची ती इनिंग जास्त महत्वाची वाटते. ‘आजही माझ्या करिअरमधील ती एक महत्वाची इनिंग आहे’ असं सचिन तेंडुलकर म्हणाला. पाकिस्तान विरुद्ध कसोटी मधील त्या इनिंगला म्हणावं तेवढं महत्वं दिल नाही, याच सचिनलाही आश्चर्य वाटतं. 16 वर्षाच्या सचिनने त्यावेळी इमराम, वकार, अक्रम, अब्दुल कादिर यांच्या तोफखान्याचा सामना केलेला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us