वैभव सूर्यवंशी याच्यासोबत श्रीलंकेच्या खेळाडूने केले नीच कृत्य, धक्कादायक प्रकार, थेट घरी जा..

अवघ्या 15 वर्षाचा भारतीय क्रिकेटर वैभव सूर्यवंशी हा श्रीलंका दाैऱ्यावर आहे. मात्र, यादरम्यानच वैभव सूर्यवंशी याचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्येच तो श्रीलंकेच्या खेळाडूला धक्का देताना दिसत आहे. मात्र, हा अर्धवटच व्हिडीओ आहे.

वैभव सूर्यवंशी याच्यासोबत श्रीलंकेच्या खेळाडूने केले नीच कृत्य, धक्कादायक प्रकार, थेट घरी जा..
Vaibhav Suryavanshi
| Updated on: Jun 16, 2026 | 12:19 PM

वैभव सूर्यवंशी याने आयपीएल 2026 मध्ये धमाका केला. दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असताना चर्चा झाली फक्त वैभव सूर्यवंशी याच्या नावाची. त्यानंतर वैभव सूर्यवंशी याचे नशीब इतके जास्त चमकले की, त्याला थेट भारतीय संघात स्थान मिळाले T-20 संघात त्याची निवड झाली. वैभव सूर्यवंशी हा सध्या श्रीलंका दाैऱ्यावर आहे. तिथेही तो धमाकेदार गेम खेळताना दिसत आहे. मात्र, आता वैभव सूर्यवंशी याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. आयपीएल 2026 मध्ये ऑरेंज कॅप जिंकून जागतिक क्रिकेटमध्ये नाव अवघ्या 15 वर्षात वैभवने कमावले. श्रीलंकेने सामना जिंकल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये वैभव सूर्यवंशी हा थेट श्रीलंकेच्या खेळाडूला धक्का मारताना दिसत आहे. त्याच्या अंगावर धावून जातोय. वैभव सूर्यवंशी याचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. अनेकांनी वैभव सूर्यवंशी याला सल्ला देण्यास सुरूवात केली.

कारण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत वैभव सूर्यवंशी यानेच श्रीलंकेच्या खेळाडूला धक्का दिल्याचे दिसतंय. पण यात खरोखरच फक्त वैभव सूर्यवंशी याची चूक आहे का? सोशल मीडियावर 35 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात वैभव सूर्यवंशी हा धावून श्रीलंकेच्या खेळाडूच्या अंगावर जाताना दिसत आहे. शिवाय त्याला धक्का देतानाही स्पष्ट दिसतोय. पहिल्यांदा व्हिडीओ बघितल्यावर वैभव सूर्यवंशी याचीच चूक दिसत आहे.

पण ज्यावेळी तुम्ही हा 59 सेकंदाचा व्हिडीओ पाहाल त्यावेळी स्पष्ट होईल की पूर्णपणे चूक ही वैभव सूर्यवंशी याची नाही. या व्हिडिओमध्ये सामना संपल्यानंतर सूर्यांश शेडगे आणि वैभव सूर्यवंशी पॅव्हेलियनकडे परतताना दिसत आहेत. ते शांतपणे जात आहेत. त्यावेळी श्रीलंकेच्या खेळाडूने वैभव सूर्यवंशी याच्याबाबत धक्कादायक विधान करत थेट चिथावणीखोर भाष्य केले.

श्रीलंकेच्या खेळाडूने थेट वैभव सूर्यवंशी याला परत घरी जाण्यास सांगितले. ज्यानंतर हे ऐकून वैभव सूर्यवंशी अधिक चिडला आणि त्याने थेट श्रीलंकेच्या खेळाडूला धक्का दिला. आता यानंतर वैभव सूर्यवंशी याच्यावर कारवाई होणार असल्याचे बोलले जात आहे. नक्की वैभव सूर्यवंशी याच्यावर काय कारवाई होते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us