AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shoaib Akhtar : तोंडावर दाखवायला भारताचं कौतुक, पण मनात..शेवटी पाकिस्तानीच, शोएब अख्तरने लायकी दाखवली VIDEO

Shoaib Akhtar : शोएब अख्तर अनेकदा भारतीय क्रिकेटचं कौतुक करताना दिसतो. पण दिसतं तसं नाहीय. पाकिस्तान आणि इंग्लंडमधील सुपर-8 सामन्याआधी शोएब अख्तरचे हे विचार समोर आले. भारतीय क्रिकेटकडे त्याची पाहण्याची नेमकी भावना काय ते समोर आलय.

Shoaib Akhtar : तोंडावर दाखवायला भारताचं कौतुक, पण मनात..शेवटी पाकिस्तानीच, शोएब अख्तरने लायकी दाखवली VIDEO
Shoaib Akhtar
| Updated on: Feb 26, 2026 | 11:02 AM
Share

भारत-पाकिस्तान सामना तसचं आयसीसी टुर्नामेंटच्यावेळी शोएब अख्तर क्रिकेट एक्सपर्ट म्हणून स्टुडिओमध्ये बसतो. भारत किंवा पाकिस्तानच्या कुठल्याही माजी क्रिकेटपटुची आपला देश जिंकावा अशी इच्छा असते. ते स्वाभाविकही आहे. त्यात काही चुकीच नाही. शोएब अख्तरही याला अपवाद असू शकत नाही. आतापर्यंत भारत-पाकिस्तान सामन्याच्यावेळी जितका वेळा शोएब अख्तर क्रिकेट एक्सपर्ट म्हणून स्टुडिओमध्ये बसलाय, तितकावेळ त्याच्यावर भारताच कौतुक करण्याची आणि पाकिस्तानच्या पराभवाचं विश्लेषण करण्याची वेळ आलीय. मनातून त्याला पाकिस्तान जिंकावा असं वाटतं असतं. पण तसं होत नाही. तोंडावर का होईना, त्याला टीम इंडियाचं कौतुक करणं भाग पडतं. पण शेवटी तो पाकिस्तानीच आहे. मनातून तो भारताबद्दल कसा विचार करतो, ते आता समोर आलय.

पाकिस्तान आणि इंग्लंडमधील सुपर-8 सामन्याआधी शोएब अख्तरचे हे विचार समोर आले. “मी देवाला प्रार्थना करीन की, इंग्लंडने खूप खराब क्रिकेट खेळावं. त्यानंतर आपण सहज दोन पॉइंट घेऊ. भारताची टीम बाहेर जाऊदे. भारताची टीम टुर्नामेंटच्या बाहेर गेली, तर आपल्या आनंदाला पारावर उरणार नाही” असं शोएब अख्तर म्हणाला. त्याच्या मनात जे होतं, ते बाहेर आलं. खरंतर या मॅचमध्ये इंग्लंडच्या ब्रुकने शतकी खेळी साकारुन पाकिस्तानला पराभवाचा पाणी पाजलं. पाकिस्तानच्या सेमीफायनल प्रवेशाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. ग्रुप 2 मधून सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारी इंग्लंड पहिली टीम बनली आहे.

कॅप्टनशिपचे त्याच्यात गुण नाहीत

पाकिस्तानचा पराभव होताच शोएब अख्तरची भूमिका चटकन बदलली. त्याने लगेच पाकिस्तानी टीमला लक्ष्य केलं. त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगाला त्याने टार्गेट केलं. कॅप्टनशिपचे त्याच्यात गुण नाहीत असं शोएब थेट म्हणाला. पाकिस्तानी टीमच्या प्लानिंगपासून ते टीमच्या रचनेवर त्याने आगपाखड केली. खरंतर हा शोएब अख्तर भारतीय वृत्त वाहिन्यांवर क्रिकेट विश्लेषक म्हणून येतो. त्याचे त्याला चांगले पैसेही मिळतात. क्रिकेट हा एक खेळ आहे. या खेळाकडे विशेषकरुन भारतीय क्रिकेटकडे पाहण्याची त्याची भावना काय आहे? ते स्पष्ट झालय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...