IND vs ENG: भारतीय संघाचा कर्णधार बनताच श्रेयस अय्यरला आला माज? कॅमरासमोर दिसला उर्मटपणा; Video Viral

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. दुसरा टी-20 सामना हा उद्या खेळला जाणार आहे. आता या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा एकत व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कर्णधार श्रेयस अय्यर रागवलेला दिसत आहे.

IND vs ENG: भारतीय संघाचा कर्णधार बनताच श्रेयस अय्यरला आला माज? कॅमरासमोर दिसला उर्मटपणा; Video Viral
shreyas iyer
| Updated on: Jul 03, 2026 | 3:33 PM

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. चेस्टर-ले-स्ट्रीट येथे पावसामुळे मालिकेतील पहिला सामना रद्द करण्यात आला. दुसरा सामना आता मँचेस्टरमध्ये खेळला जाईल, जिथे भारतीय संघ आधीच दाखल झाला आहे. भारतीय संघ उद्या टी-20 सामना खेळेल. इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकायची ही आशा घेऊनच भारतीय संघाने ही मोहिम सुरु केली असणार कारण आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्याने मोठी नामुष्की ओढवलेली आहे.  दुसरा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ मँचेस्टरला पोहोचला आहे. या दरम्यानचा एक व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इतर खेळाडू अतिशय नम्रपणे दिसत आहे पण कर्णधार श्रेयस अय्यरचे तोंड रागाने लाल झालेले दिसत आहे.

मालिकेतील दुसरा सामना शनिवारी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ जिंकण्याच्या प्रयत्नात असतील, तर श्रेयस आपल्या कर्णधारपदाखाली संघाला पहिला विजय मिळवून देण्यासाठी उत्सुक असेल. भारतीय संघ मँचेस्टरमध्ये बसने प्रवास करत होता. संघ डरहमहून बसने मँचेस्टरला पोहोचला. बसमधील सर्व खेळाडूंच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाल्या. प्रवासादरम्यान, संघ काही खाद्यपदार्थ आणि पेये खरेदी करण्यासाठी एका ठिकाणी थांबला. यावेळी, कॅमेऱ्याने तिलक वर्मा आणि श्रेयसवर लक्ष केंद्रित केले. तिलक संघाचा नवीन उपकर्णधार आहे आणि श्रेयस कर्णधार आहे. तिलकने श्रेयसच्या खांद्यावर हात ठेवून त्याला कॅमेऱ्याकडे पाहण्याचा इशारा केला. यावेळी श्रेयसच्या डोळ्यार राग दिसत होता.  मात्र, श्रेयसने हा कदाचित गंमतीत केले असावे असे म्हटले जात आहे.

या व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशी देखील खूप मजा करताना दिसला. व्हिडिओची सुरुवात त्याच्यापासून होते. तो स्टायलिशपणे हसत आपला चष्मा लावतो आणि मग कॅमेरा इतर खेळाडूंकडे वळतो. जेव्हा टीम इंडियाची बस थांबते, तेव्हा कॅमेरा पुन्हा एकदा वैभववर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा तो चायनामन गोलंदाजीची ॲक्शन करताना दिसला. टीम इंडिया वैभवला पदार्पणाची संधी कधी देईल, हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. संजू सॅमसन फॉर्ममध्ये नसल्यामुळे, भारत दुसऱ्या टी-20 मध्ये वैभवला संधी देण्याची दाट शक्यता आहे.

Follow Us