AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma: रोहित शर्माची बादशाहत संपली; 30 वर्षीय खेळाडूने मोडला रेकॉर्ड, अवघ्या 60 मॅचमध्ये हिटमॅटनला मागं सोडलं

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम दीर्घकाळ आपल्या नावावर ठेवणाऱ्या रोहित शर्माच्या नावावर होता. पण आता तो रेकॉर्ड त्याच्या नावावर राहिलेला नाही, रोहित शर्माच्या नावाचा रेकॉ़र्ड आता ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाच्या नावावर झाला आहे.

Rohit Sharma: रोहित शर्माची बादशाहत संपली; 30 वर्षीय खेळाडूने मोडला रेकॉर्ड, अवघ्या 60 मॅचमध्ये हिटमॅटनला मागं सोडलं
rohit sharma
| Updated on: Jul 03, 2026 | 2:29 PM
Share

ऑस्ट्रियाच्या करणबीर सिंगने हंगेरीविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला. त्याने अवघ्या 57 चेंडूंमध्ये 18 चौकार आणि 12 उत्तुंग षटकारांसह 164 धावा ठोकल्या. या स्फोटक खेळीमुळे करणबीरने एक मोठा टप्पा गाठला आणि भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माकडून अव्वल स्थान हिसकावून घेतले. करणबीर आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. त्याच्या नावावर आता टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 207 षटकार आहेत. 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्त झालेला रोहित, 205 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

‘हिटमॅन‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 151 डावांमध्ये 4231 धावा केल्या आणि 205 षटकार ठोकले. 200 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा रोहित हा पहिला फलंदाजही ठरला. बऱ्याच काळापासून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम रोहितच्या नावावर होता पण आता करणबीर सिंगने केवळ 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हा पराक्रम करून त्याला मागे टाकले आहे. 207 षटकारांसह, करणबीर आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज करणबीर सिंग (ऑस्ट्रिया) – 207 षटकार रोहित शर्मा (भारत) – 205 षटकार मुहम्मद वसीम (यूएई) – 196 षटकार सूर्यकुमार यादव (भारत) – 179 षटकार जोस बटलर (इंग्लंड) – 175 षटकार

करणबीर सिंगची टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द 30 वर्षीय करणबीर सिंगने 25 मे 2024 रोजी बेल्जियमविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. करणबीरने आतापर्यंत 60 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, 59 डावांमध्ये 48.71 च्या प्रभावी सरासरीने आणि 175.41 च्या स्ट्राइक रेटने 2533 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर चार शतके आणि 20 अर्धशतकेही आहेत. 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत 129 सामन्यांच्या 151 डावांमध्ये 205 षटकार ठोकले, तर करणबीर सिंगने 60 सामन्यांच्या केवळ 59 डावांमध्ये 207 षटकार मारून रोहितला मागे टाकले.  करणबीरने रोहितला लागलेल्या डावांच्या निम्म्याहून कमी डावांमध्येच हा जादुई आकडा पार केला आहे.

Follow Us
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?