IND vs WI : चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून दारुण पराभव होऊनही श्रेयस अय्यरने कोणाचं कौतुक केलं?
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये काल चौथा टी20 सामना झाला. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा पालापाचोळा केला. भारताला विजयासाठी सुमारे 248 धावांचं टार्गेट मिळालं होतं. टीम इंडियाने हा सामना गमावूनही श्रेयस अय्यरने मॅच संपल्यावर कोणाचं तरी कौतुक केलं.

टीम इंडियाला काल दारुण पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला 24 धावांनी हरवलं. हैदराबाद मध्ये हा सामना झाला. भारताला हरवून वेस्ट इंडिजने पाच टी20 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली आहे. हा पराभव टीम इंडियाच्या जिव्हारी लागणारा आहे. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला सर्वाधिक दु:ख देणारा आहे.हैदराबादमधल्या या पराभवानंतर श्रेयस अय्यरला कारण विचारण्यात आलं, तेव्हा त्याने थेट गोलंदाजांवर हल्लाबोल केला. तेच या पराभवाचे स्क्रिप्ट रायटर आहेत असं श्रेयस म्हणाला.
चौथा टी20 सामना संपल्यानंतर श्रेयस अय्यरला टीम इंडियाच्या परफॉर्मन्स बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्याने पराभवाची सुरुवात गोलंदाजीने होत असल्याचं सांगितलं. “पराभवासाठी श्रेयसने गोलंदाजांना जबाबदार धरलं. आम्ही बॉलिंगमध्ये योग्य दिशा आणि टप्पा ठेवला नाही. त्यामुळे आम्हाला रन चेजसाठी 250 धावांचं टार्गेट मिळालं” असं श्रेयसने सांगितलं. “धावांचा पाठलाग करताना फलंदाजांच्या अप्रोचचं श्रेयसने कौतुक केलं. पण दुर्देवाने आमचे गोलंदाज योग्य पद्धतीने योजनेची अंमलबजावणी करु शकले नाहीत. ते आमच्या पराभवाचं मोठ कारण ठरलं” असं श्रेयस अय्यर म्हणाला.
अर्शदीप सिंहचा नको तो रेकॉर्ड
श्रेयस अय्यरने आपल्या गोलंदाजांवर योग्य दिशा आणि टप्प्यावर गोलंदाजी न करण्याचा आरोप केला. पण तो आरोप कितपत योग्य आहे?. त्याचा अंदाज तुम्ही आकड्यांवरुन लावू शकता. भारतीय गोलंदाजांनी फक्त हैदराबाद मध्येच नाही, तर मागच्या 3 टी 20 सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजचे हे तिन्ही सामने आहेत. अर्शदीप सिंह T20I मध्ये सर्वात जास्त 7 वेळा 50 पेक्षा जास्त धावा देणारा गोलंदाज बनला आहे. हैदराबाद t20 मध्ये अर्शदीप सिंह शिवाय भारताचा दुसरा वेगवान गोलंदाज मयंक यादवने 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. T20 मध्ये वाइड आणि नो बॉल मिळून सर्वाधिक 150 एक्स्ट्रा चेंडू फेकणारा अर्शदीप सिंह एकमेव गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 132 वाइड आणि 18 नो बॉल टाकले आहेत.
अशी गोलंदाजी असेल तर कुठला भारतीय कर्णधार भडकणार नाही?. भारतीय बॉलर्सच्या दिशाहिन गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने पहिली फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 3 विकेट गमावून 247 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात भारतीय टीम 19.3 ओव्हर्समध्ये 223 धावांवर ऑलआऊट झाली.
