Shubman Gill: IND vs NZ मालिकेपूर्वीच गिलवर ओढवली नामुष्की, रणजी ट्रॉफीमध्ये लॉकल बॉलरसमोर पडला फिका
Shubman Gill Out: भारत आणि न्यूझीलंड वनडे मालिकेपूर्वी शुभमन गिलवर मोठी नामुष्की ओढवली आहे. गिल आता रणजी ट्रॉफीमध्ये एका लॉकल गोलंदाजासमोर केवळ एक धावा करुन बाद झाला. तो कसा बाद झाला ते पाहा...

Ranji Trophy 2025-26 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लवकरच मालिका रंगणार आहे. टी-२० आणि वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. न्यूझीलंडच्या सहा आठवड्यांच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी, भारतीय कर्णधार शुभमन गिलचे रणजी ट्रॉफीमधील पुनरागमन निराशाजनक ठरले. रविवारी न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर छत्तीसगडविरुद्ध पंजाबकडून खेळताना गिल स्वस्तात बाद झाला. लाल चेंडूने सामन्याचा सराव आणि लय मिळवण्यासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला हा गिल केवळ एका धावेवर क्लीन बोल्ड झाला. भारत न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका रंगली. यानंतर आता पाच सामन्यांची वनडे मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी गिलचे असे बाद होणे चिंताजनक ठरत आहे.
गिल कसा बाद झाला?
पंजाबच्या पहिल्या डावात, शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने केवळ पाच चेंडूंचा सामना केला आणि फक्त एक धाव काढली. गिलची विकेट छत्तीसगडचा डावखुरा फिरकी गोलंदाज अजय मंडलने घेतली, ज्याने आपल्या अचूक गोलंदाजीने भारतीय कर्णधाराचा मधला स्टम्प उडवला. अजय मंडलचा एक चेंडू खेळपट्टीवर पडला, त्याने आपली दिशा कायम ठेवली आणि तो आत वळला. गिलला चेंडूची दिशा ओळखून बचाव करण्याची संधी मिळण्यापूर्वीच, चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडमधील फटीतून वेगाने गेला आणि मधल्या स्टम्पला लागला. अशाप्रकारे, पहिल्याच सेशनमध्ये त्याच्या मोठ्या खेळीच्या आशांवर पाणी फिरले.