IND vs NZ ODI: तो नाहीये तर सगळंच अवघड होतंय…विराट, रोहित खेळत असूनही गिलला जाणवतेय त्याची कमतरता
Shubman Gill On Team India: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिका रंगणार आहे. या वनडे सामन्यापूर्वी शुभमन गिलने आता एक विधान केले आहे.

IND vs NZ ODI Match: भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांचे नेतृत्व शुभमन गिल करेल, तर उर्वरित दोन सामन्यांचे नेतृत्व श्रेयस अय्यर करेल. भारतीय संघाने टी-२० मालिका जिंकली आता वनडे मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज असणार आहे.
पहिल्या सामन्यापूर्वी शुभमन गिल म्हणाला की, “जर एकदिवसीय मालिका टी-२० मालिकेपूर्वी खेळवली गेली असती, तर त्यांना पूर्ण ताकदीचा संघ मैदानात उतरवता आला असता, पण तसे झाले नाही. मला कसोटी मालिकेवरही लक्ष केंद्रित करायचे आहे, जी आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा एक भाग आहे. ”
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शुभमन गिल म्हणाला, “सर्वप्रथम, हार्दिक पांड्या एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. जगात फार कमी खेळाडूंकडे त्याच्यासारखी कौशल्ये आहेत. एक गोलंदाज म्हणून, तुम्ही त्याचा खेळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उपयोग करू शकता. तो नवीन आणि जुन्या दोन्ही चेंडूंनी गोलंदाजी करू शकतो. आम्ही अनेकदा बोललो आहोत. दुखापतींमुळे त्याचे नशीब खराब राहिले आहे. आयपीएलनंतर तो खेळलेला नाही. आशा आहे की, तो लवकरच परत येईल. तो काही देशांतर्गत क्रिकेट खेळेल आणि आशा आहे की, आम्ही त्याला लवकरच भारतीय संघात परत आणू शकू.”
एकदिवसीय मालिकेपूर्वी टी-२० मालिका आयोजित करण्याबद्दल शुभमन गिल म्हणाला, “जर एकदिवसीय मालिका टी-२० मालिकेपूर्वी झाली असती, तर आम्ही सर्व सामने पूर्ण ताकदीनिशी खेळू शकलो असतो, पण कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधील विश्रांतीचा कालावधी कमी होता, आणि आता विश्वचषक स्पर्धेचे गुणतालिका खूपच रंजक झाली आहे.” भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना १५ नोव्हेंबरला खेळला जाईल, तर पहिली कसोटी १९ नोव्हेंबरला सुरू होईल. यामुळे खेळाडूंना फॉरमॅट बदलण्यासाठी खूपच कमी वेळ मिळतो. म्हणूनच गिलसह अनेक खेळाडू फक्त पहिले तीन एकदिवसीय सामने खेळतील आणि त्यानंतर कसोटी मालिकेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करतील, कारण ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.