AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana : स्मृती मानधना हिच्या वडिलांची प्रकृती आता कशी ? होणारा पती पलाशबद्दलही मोठे अपडेट समोर

भारतीय क्रिकेटर स्मृती मानधनाचे लग्न वडिलांच्या अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे पुढे ढकलले आहे. लग्नाआधी वडिलांना हृदयविकाराचा झटका आला, तर होणारा पती पलाश मुच्छलही आजारी पडला. त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स समोर आले आहेत.

Smriti Mandhana : स्मृती मानधना हिच्या वडिलांची प्रकृती आता कशी ? होणारा पती पलाशबद्दलही मोठे अपडेट समोर
स्मृती मानधनाच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स
| Updated on: Nov 24, 2025 | 1:22 PM
Share

भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि स्टार क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे, काल होणारं तिचं व पलाश मुच्छल याचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. काल ( रविवार 23 नोव्हेंबर) सांगलीत त्यांचा विवाह सोहळा पार पडणार होता. तायाधई शुक्रवारपासूनच विविध विधी, संगीत, हळद य़ांना सुरूवा झाली. मात्र लग्नाच्या काही तास आधीच स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली. त्यांना हार्ट अटॅक आल्याने सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वडिलांची प्रकृती पाहन स्मृतीने लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला. मात्र त्यानंतर कालच्याच दिवशी स्मृतीचा होणार पती पलाश मुच्छल याचीही तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली होती.

व्हायरल इन्फेक्श आणि पित्त वाढल्याने लाश मुच्छल याच्यावरही सांगलीच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. याचदरम्यान आता स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या तब्येतीबाबत नवी माहिती समोर आली आहे. तसेच पलाशच्या प्रकृतीबद्दल माहिती कळली आहे.

कशी आहे स्मृतीच्या वडिलांची तब्येत ?

भारतीय महिला संघाची उपकर्णधार क्रिकेटपटू स्मृती मानधन आईचा विवाह सोहळा लांबणीवर पडला. लग्नस्थळी असतानाच स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि अंडर ऑब्झर्व्हेशनही ठेवण्यात आलं होतं. आता त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स समोर आले असून सध्या स्मृतीचे वडील, श्रीनिवास मानधना यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्याचं आलं आहे. त्यामुळे स्मृती व तिच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असून चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे,

होणार पती पलाशची प्रकृती कशी आहे ?

काल लग्नाच्या आधीच वडिलांची तब्येत बिघडली, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, यामुळे स्मृती मानधना ही टेन्शनमध्ये असतानाच संध्याकाळी तिला आणखी एक धक्का बसला. स्मृतीचा होणारा पती, संगीतकार पला मुच्छल याचीही प्रकृती काल संध्याकाळी बिघडली होती. खाजगी रुग्णालयातून उपचार घेऊन पलाश हा हॉटेलकडे रात्री रवाना झाला होता. आता त्याची प्रकृीतीही बरी असल्याचे समजते.

दरम्यान स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं, त्यांना बरं वाटल्यानंतरचं स्मृती आणि पलाशच्या विवाहाबाबतीत पुढचा निर्णय घेतला जाईल,असं सांगण्यात येत आहे.

त्या व्हिडीओची चर्चा

पलाशसोबतचं लग्न पुढे ढकलण्यात आल्यावर स्मृतीने एक मोठं पाऊल उचललं . स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील लग्नाशी संबंधित सर्व फोटो आणि व्हिडीओ काढून टाकले. लग्नाच्या विधी, समारंभादरम्यान स्मृतीने भारतीय संघातीली तिच्या मैत्रिणींसोबत एक रीलही टाकलं होतं, ‘समझो हो ही गया’ या गाण्यावर डान्स करत तिने या व्हिडीओत साखरपुड्याची अंगठी दाखवली होती. पण तो व्हिडीओ तिने हटवला. तसेच पलाशने तिला डी.वाय. पाटील स्टेडिअम वर प्रपोज केल्याचा व्हिडीओही काढून टाकला आहे. मात्र याबाबत स्मृती मानधना किंवा त्याच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे काही स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...