‘बघितलस काय झालं? देशाच्या लोकांनी तुला..’, शोएबचं दुसरं लग्न, सानियाला उपदेशाचे डोस

Shoaib malik Second marriage | शोएब मलिकच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर कमेंटसचा पूर आला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत शोएब मलिकने दुसर लग्न केलय. आता त्यावरुन सानिया मिर्झालाही ट्रोल केलं जातय.

बघितलस काय झालं? देशाच्या लोकांनी तुला.., शोएबचं दुसरं लग्न,  सानियाला उपदेशाचे डोस
shoaib malik second marriage with sana javed
| Updated on: Jan 20, 2024 | 1:48 PM

Shoaib malik Second marriage | भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची मागच्या एक-दीड वर्षापासून चर्चा आहे. ही चर्चा सुरु असतानाच शनिवारी एक धक्कादायक बातमी समोर आली. शोएब मलिकने दुसर लग्न केलं. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत शोएबने लग्न केलय. शोएबने स्वत:च टि्वटर, इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन दुसऱ्या लग्नाची माहिती दिली. शोएबच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले असून त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट सुरु झाल्या आहेत.

सानिया मिर्झाने शोएब मलिकशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तिच्यावर बरीच टीका झाली होती. 2010 मध्ये दोघांच लग्न झालं. भारतातून काही जणांनी सानियाला या निर्णयासाठी ट्रोल केलं होतं. तिला बरच सुनावल होतं. पण सानिया आपल्या लग्नाच्या निर्णयावर ठाम होती. सानियाने शोएबशी लग्न केलं. लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष आनंदात गेली. 10-12 वर्षाच्या संसारानंतर अखेर दोघे विभक्त झाले.


तेव्हाच सानियाला समजलेलं

शोएब मलिकचा दुसरा विवाह हा सानिया मिर्झासाठी मोठा धक्का आहे. मागच्या एक-दोन वर्षापासून दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली होती. सानियाने सोशल मीडियावर काही उपरोधिक पोस्ट करुन शोएबपासून वेगळ होणार असल्याचे संकेत देत होती. तसेही दोघे स्वतंत्र राहत होते. अलीकडेच सानियाने शोएब मलिकसोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावरुन हटवले. याचाच अर्थ की सानियाला शोएबच्या लग्नाबद्दल समजल होतं.


काही तुटलेल्या नात्याची मजा घेत आहेत

शोएब मलिकच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट येत आहे. बरेच जण यावर व्यक्त होत आहे. शोएब मलिकबरोबर सानिया मिर्झाला सुद्धा ट्रोल केलं जातय. सानिया मिर्झाला उपदेशाचे डोस दिले जात आहे. तुला सांगितलं होत लग्न करु नकोस, असं युजर तिला सुनावत आहे. काही मजेशीर पोस्ट करुन तुटलेल्या नात्याची मजा घेत आहेत.