South Africa vs West Indies T20 WC Highlight Score : दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजला 9 विकेट राखून केलं पराभूत

South Africa vs West Indies, T20 world Cup 2026 Highlight Score Updates in Marathi : दक्षिण अफ्रिकेची टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम आहे. सुपर 8 फेरीतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले. वेस्ट इंडिजला पराभूत करताच उपांत्य फेरीत स्थान मिळवणं ही औपचारिकता राहिली आहे.

South Africa vs West Indies T20 WC Highlight Score : दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजला 9 विकेट राखून केलं पराभूत
WI vs SA
Image Credit source: Icc X Account
| Edited By: | Updated on: Feb 26, 2026 | 8:21 PM

सुपर 8 फेरीतील गट 1 मध्ये दक्षिण अफ्रिकेने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला 9 आणि 23 चेंडू राखून पराभूत केलं आहे. यासह उपांत्य फेरीत जागा जवळपास पक्की केली आहे. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 176 धावा केल्या आणि विजयासाठी 177 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 16.1 षटकात 1 गडी गमवून पूर्ण केलं. एडन मार्करम, क्विंटन डिकॉक आणि रिकल्टन या तिघांनी हा सामना संपवला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 26 Feb 2026 06:14 PM (IST)

    WI vs SA Super 8 Live Score Updates : दक्षिण अफ्रिका विजयी

    वेस्ट इंडिजने विजयासाठी 177 धावांचं आव्हान दक्षिण अफ्रिकेसमोर ठेवलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने फक्त 1 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्क केलं आहे. यामुळे भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं गणित सोपं झालं आहे.

  • 26 Feb 2026 05:51 PM (IST)

    WI vs SA Super 8 Live Score Updates : सामन्यावर दक्षिण अफ्रिकेची पकड

    दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यावर पकड मिळवली आहे. एडन मार्करम, क्विंटन डीकॉक आणि रिकल्टनच्या झंझावातामुळे वेस्ट इंडिज बॅकफूटवर गेला आहे. त्यामुळे हा सामना पूर्णपणे दक्षिण अफ्रिकेकडे झुकला आहे. आता फक्त 48 चेंडूत 49 धावांची आवश्यकता आहे.

  • 26 Feb 2026 05:38 PM (IST)

    WI vs SA Super 8 Live Score Updates : एडन मार्करमचं झंझावाती अर्धशतक

    धक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. त्याने  27 चेंडूत 50 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 185.19 चा होता. एडन मार्करमने अर्धशतकी खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले.

  • 26 Feb 2026 05:33 PM (IST)

    WI vs SA Super 8 Live Score Updates : दक्षिण अफ्रिकेला पहिला धक्का

    दक्षिण अफ्रिकेने आश्वासक सुरूवात केली आहे. पहिल्या विकेटसाठी वेस्ट इंडिजला धडपड करावी लागली.. अखेर रॉस्टन चेसने हे यश मिळवून दिलं. क्विंटन डी कॉकला 47 धावांवर असताना तंबूत पाठवलं. पण दक्षिण अफ्रिकेने 95 धावांपर्यंत मजल मारली आहे.

  • 26 Feb 2026 05:24 PM (IST)

    WI vs SA Super 8 Live Score Updates : वेस्ट इंडिज विकेटच्या शोधात

    वेस्ट इंडिजने विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं आहे. या धावांचा पाठलाग  करताना दक्षिण अफ्रिकेने जबरदस्त सुरुवात केली आहे. पावर प्लेमध्ये बिनबाद 69 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता वेस्ट इंडिजला विकेटची गरज आहे.

  • 26 Feb 2026 05:22 PM (IST)

    WI vs SA Super 8 Live Score Updates : पावर प्लेच्या खेळात दक्षिण अफ्रिकेची सरशी

    पावर प्लेच्या सहा षटकात दक्षिण अफ्रिकेने जबरदस्त खेळी केली. क्विंटन डी कॉक आणि एडन मार्करम यांनी चांगली आणि आश्वासक सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी पावर प्लेमध्ये धावांची भागीदारी केली. एडन मार्करमने 43 धावा, तर क्विंटन डीकॉकने 25 धावा केल्या.

  • 26 Feb 2026 04:59 PM (IST)

    WI vs SA Super 8 Live Score Updates : दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला सुरुवात, मार्करम-डीकॉक मैदानात

    दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कॅप्टन एडन मार्करम आणि क्विंटन डीकॉक सलामी जोडी मैदानात आली आहे.  वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेसमोर 177 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

  • 26 Feb 2026 04:44 PM (IST)

    SA vs WI Live Score : दक्षिण आफ्रिकेकडून भ्रमनिरास, 7 बाद 83 वरुन वेस्ट इंडिजने गेम फिरवला

    दक्षिण आफ्रिकेकडून भ्रमनिरास झाला आहे. एकवेळ वेस्ट इंडिजची हालत 7 बाद 83 धावा होती. तिथून जेसन होल्डर आणि रोमारियो शेपर्डची जोडी जमली. दोघांनी 20 ओव्हर्समध्ये वेस्ट इंडिजला 176 धावांपर्यंत पोहोचवलं. होल्डरने 31 चेंडूत 49 धावा केल्या यात चार फोर आणि तीन सिक्सचा समावेश होता. शेपर्डने 37 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. यात 3 फोर 4 सिक्सचा समावेश होता. दोघांनी आठवड्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली.

     

  • 26 Feb 2026 04:36 PM (IST)

    SA vs WI Live Score : 6,1,4,6,2,4, यानसेनला झोडलं

    वेस्ट इंडिजच्या 18 ओव्हर अखेरीस 7 बाद 163 धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यानसेनला जेसन होल्डरने झोडलं. त्याच्या 18 व्या ओव्हरमध्ये 23 धावा वसूल केल्या. होल्डर 47 आणि शेपर्ड 41 धावांवर खेळतोय.

  • 26 Feb 2026 04:28 PM (IST)

    SA vs WI Live Score : होल्डर-शेपर्ड धोपटतायत, उरल्या शेवटच्या 3 ओव्हर्स

    वेस्ट इंडिजच्या 17 ओव्हर अखेरीस 7 बाद 140 धावा झाल्या आहेत. शेपर्ड 27 चेंडूत 41 आणि होल्डर 22 चेंडूत 25 धावांवर खेळत आहे. शेपर्डने 1 फोर, 4 सिक्स मारल्या आहेत. होल्डरने 2 फोर , 2 सिक्स मारल्या आहेत.

  • 26 Feb 2026 04:19 PM (IST)

    SA vs WI Live Score : जेसन होल्डर-रोमारियो शेपर्डची जोडी जमली

    जेसन होल्डर 24 धावा आणि रोमारियो शेपर्ड 21 यांची जोडी खेळपट्टीवर स्थिरावली आहे. 15 ओव्हर अखेरीस वेस्ट इंडिजच्या 7 बाद 118 धावा झाल्या आहेत.

  • 26 Feb 2026 04:12 PM (IST)

    SA vs WI Live Score : वेस्ट इंडिजची सेंच्युरी पूर्ण

    14 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला असून 7 विकेट गमावलेल्या वेस्ट इंडिजचं धावांच शतक पूर्ण झालं आहे. वेस्ट इंडिजच्या 109 धावा झाल्या आहेत. जेसन होल्डर 23 धावा आणि रोमारियो शेपर्ड 13 धावांवर खेळत आहे.

  • 26 Feb 2026 04:01 PM (IST)

    SA vs WI Live Score : वेस्ट इंडिजचा सातवा विकेट

    11 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. वेस्ट इंडिजच्या 7 बाद 86 धावा. मॅथ्यू फोर्डी 11 रन्सवर आऊट झाला. जेसन होल्डर 10 आणि रोमारिया शेपर्डची जोडी मैदानात आहे. वेस्ट इंडिजला लवकर गुंडाळण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल.

  • 26 Feb 2026 03:55 PM (IST)

    SA vs WI Live Score : 20 पैकी 10 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    20 पैकी 10 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. वेस्ट इंडिजच्या 6 बाद 82 धावा. जेसन होल्डर 10 आणि मॅथ्यू फोर्डीची 11 जोडी मैदानात आहे. वेस्ट इंडिजला लवकर गुंडाळण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल.

     

  • 26 Feb 2026 03:52 PM (IST)

    SA vs WI Live Score : दक्षिण आफ्रिकेचा भेदक मारा, वेस्ट इंडिजचा अजून एक फलंदाज तंबूत

    वेस्ट इंडिजची अजून एक विकेट. नऊ ओव्हर अखेरीस वेस्ट इंडिजच्या 6 बाद 72 धावा. रोव्हमॅन पॉवेल 9 रन्सवर आऊट. निगीडीने केलं बाद. निगीडीने 3, रबाडाने 2 आणि बॉशने एक विकेट काढला.

     

  • 26 Feb 2026 03:40 PM (IST)

    SA vs WI Live Score : वेस्ट इंडिजची वाईट अवस्था, अजून एक धक्का

    वेस्ट इंडिजला अजून एक झटका. सात ओव्हर अखेरीस वेस्ट इंडिजच्या 5 बाद 60 धावा. रुदरफोर्ड 12 धावांवर आऊट. बॉशने क्विंटन डि कॉक करवी केलं झेलबाद. महत्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिज अडचणीत

  • 26 Feb 2026 03:33 PM (IST)

    WI vs SA Live : वेस्ट इंडिज बॅकफूटवर

    6 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला असून वेस्ट इंडिजच्या 4 बाद 52 धावा झाल्या आहेत. रोव्हमॅन पॉवेल 7 आणि रुदरफोर्ड 2 यांची जोडी मैदानात आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली.

     

  • 26 Feb 2026 03:23 PM (IST)

    SA vs WI Live Score : चांगल्या सुरुवातीनंतर वेस्ट इंडिजला चार धक्के

    चार ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आहे. वेस्ट इंडिजला चांगल्या सुरुवातीनंतर चार धक्के बसले आहेत. ब्रँडन किंग 21 धावांवर आऊट झाला. कॅप्टन शाई होप 16 धावांवर बाद झाला. शिमरॉन हेटमायर 2 धावांवर आऊट झाला. रोस्टॉन चेस 2 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिजने चार ओव्हरमध्ये 43 धावांवर 4 विकेट गमावले आहेत.

     

  • 26 Feb 2026 02:44 PM (IST)

    SA vs WI Live Score : दोन्ही टीम्सची प्लेइंग-11

    वेस्टइंडीज: ब्रँडन किंग, शाई होप (कॅप्टन-विकेटकिपर), शिमरन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्डे, रोस्टन चेज, गुडाकेश मोती, शमर जोसेफ

    दक्षिण अफ्रीका: एडन मार्करम (कॅप्टन), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), रेयान रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को यानसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी

  • 26 Feb 2026 02:37 PM (IST)

    WI vs SA Live : दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडिज टॉस कोणी जिंकला

    दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये थोड्याच वेळात सामना सुरु होईल. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे वेस्ट इंडिजची टीम पहिली बॅटिंग करेल.

  • 26 Feb 2026 01:51 PM (IST)

    WI vs SA Live : जिंकताना रनरेट चांगला हवा, मग भारतासाठी आज झिम्बाब्वे विरुद्ध पहिली बॅटिंग की, बॉलिंग फायद्याची?

    दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्याचा निकाल भारतासाठी महत्वाचा आहेच. पण झिम्बाब्वे विरुद्ध चांगल्या रनरेटने जिंकायचं असेल तर भारताने पहिली बॅटिंग की,बॉलिंग घेतली पाहिजे. वाचा सविस्तर…

  • 26 Feb 2026 01:49 PM (IST)

    WI vs SA Live : दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्यात आज असं घडलं, तर मग रनरेटला महत्व नाही

    दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्यात आज असं घडलं, तर मग रनरेटला महत्व नाही. वाचा सविस्तर भारत-झिम्बाब्वेमध्ये सुपर-8 राऊंडमधील सामना गुरुवारी संध्याकाळी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होईल.

  • 26 Feb 2026 01:37 PM (IST)

    SA vs WI Live : भारतासाठी हा सामना का महत्वाचा?

    दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज सामन्याचा निकाल भारतासाठी सुद्धा महत्वाचा आहे. कारण या मॅचच्या निकालावर भारताच्या सेमीफायनल प्रवेशाची बरीच गणित अवलंबून असणार आहेत.

  • 26 Feb 2026 01:35 PM (IST)

    SA vs WI Live : किती वाजता सुरु होणार दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडिज सामना?

    दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आज दुपारी 3 वाजता सामना सुरु होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. सुपर -8 राऊंडमधील हा सामना महत्वाचा आहे.

Follow Us