AB de Villiers | एबी डिव्हिलियर्स तिसऱ्यांदा बाबा होणार

| Updated on: Jul 15, 2020 | 4:24 PM

डिव्हिलियर्सने पाच वर्षांच्या डेटिंगनंतर 2012 मध्ये आपली मैत्रीण डॅनियल स्वार्ट हिला 'ताजमहाल'समोर प्रपोज केले होते.

AB de Villiers | एबी डिव्हिलियर्स तिसऱ्यांदा बाबा होणार
Follow us on

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स तिसऱ्यांदा बाबा होणार आहे. पत्नी डॅनिएल डिव्हिलियर्सने बेबी बम्पचे फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली. डॅनिएल डिव्हिलियर्सने मंगळवारी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ‘हॅलो बेबी गर्ल’ असे कॅप्शन लिहिले आहे. तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा पाऊस पडला. (South African former Captain AB de Villiers and wife Danielle de Villiers to have third child together)

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही पती विराट कोहलीचा ‘रॉयल चॅलेंजर्स’मधील सहखेळाडू एबी डिव्हिलियर्सचे अभिनंदन केले. “अभिनंदन डॅनिएल आणि एबी. किती आनंदाची बातमी” अशी कमेंट अनुष्काने केली.

तिसर्‍या बाळाचे स्वागत करण्यास आपण उत्सुक असल्याचे एबी डिव्हिलियर्सने म्हटले आहे. डिव्हिलियर्स दाम्पत्याला दोन मुले आहेत. मोठा मुलगा अब्राहम पाच वर्षांचा तर धाकटा जॉन रिचर्ड तीन वर्षांचा आहे.

डिव्हिलियर्सने पाच वर्षांच्या डेटिंगनंतर 2012 मध्ये आपली मैत्रीण डॅनियल स्वार्ट हिला ‘ताजमहाल’समोर प्रपोज केले होते. या दोघांनी पाच वर्षांच्या डेटिंगनंतर मार्च 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या बेला-बेला येथे लग्न केले. आपल्या मुलाचे नाव ‘ताज’ ठेवण्याची इच्छाही त्याने मागे बोलून दाखवली होती.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून एबी डिव्हिलियर्स आपल्या कुटुंबासमवेत जास्त वेळ घालवत आहे. खरं तर, निवृत्तीची घोषणा करतानाच एबी डिव्हिलियर्सने आपली पत्नी आणि दोन मुलांसमवेत असण्याचे महत्त्व सांगितले होते.

पुनरागमन लांबणीवर

एबी डिव्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेकडून पुनरागमन करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त होते. परंतु कोविड19 साथीच्या रोगामुळे ते लांबणीवर पडले. आता तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

2004 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर 2005 च्या सुरुवातीस तो पहिल्यांदा वन डे आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

एबी डिव्हिलियर्सने केवळ 31 चेंडूत वेगवान एकदिवसीय शतक करण्याचा विक्रम केला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 आणि 150 धावांचीही नोंद केली आहे.

मे 2018 मध्ये सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा त्याने केली होती. परंतु जानेवारी 2020 मध्ये डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा मानस व्यक्त केला होता. टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याची त्याची इच्छा आहे. (South African former Captain AB de Villiers and wife Danielle de Villiers to have third child together)