AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यकुमार यादव संतापला, थेट वाद, तो धक्कादायक अखेर पुढे, भारतीय क्रिकेट संघात…

दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात भारताला दारूण पराभव स्वीकारावा लागला. पुढील दोन सामने जिंकल्याशिवाय भारताकडे कोणताही पर्याय नाही. सामन्यातील पराभवानंतर सूर्यकुमार यादव काही गोष्टींवर स्पष्ट बोलताना दिसला. यादरम्यानच आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार यादव संतापला, थेट वाद, तो धक्कादायक अखेर पुढे, भारतीय क्रिकेट संघात...
Suryakumar Yadav
| Updated on: Feb 24, 2026 | 11:27 AM
Share

आयसीसी T-20 वर्ल्ड कप 2026 ची भारताची दमदार सुरूवात झाली. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात भारताला दारून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचे खापर ईशान किसन, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांच्यावर फोडण्यात आले. दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत सामना खेळत असताना तिन्ही खेळाडूंचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. दक्षिण आफ्रिकेचा संघ तडगा असतानाही त्यांना हलक्या घेण्याची चूक भारतीय क्रिकेटर्सने केली. पावरप्लेमध्ये दणादण एका मागून एक अशा तीन विकेट भारताच्या पडल्या आणि तिथेच मोठा झटका लागला. शिवम दुबे याने धमाकेदार खेळी खेळली पण त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. शेवटी त्यानेही हात टेकले. आता पुढील दोन सामने भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावी लागणार आहेत, दुसरा तिसरा कोणताही पर्याय भारताकडे उपलब्धच नाही. गंभीरने आखलेली रणनीतीही फेल गेल्याचे बोलले जात आहे.

हा फक्त एका सामन्यातील पराभव नाही तर हा भारतीय संघासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघ तणावात बघायला मिळाला. यादरम्याचन सूर्यकुमार यादव याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सूर्या चांगलाच गंभीर दिसत असून तो सपोर्ट स्टॉफ आणि गाैतम गंभीरसोबत चर्चा करताना दिसतोय, असे सांगितले जातंय की, त्याचा यादरम्यान वादही झाला.

76 धावांनी दक्षिण आफ्रिकेकडून पराभव हा भारतीय संघासाठी मानहानीकारक नक्कीच आहे. या पराभवानंतर सूर्यकुमार यादव नाराज झाला. फक्त नाराजच नाही तर व्हायरल व्हिडीओमध्ये तो डगआऊटमध्ये सपोर्ट स्टाफ आणि गाैतम गंभीर यांच्यासोबत चर्चा करताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावरील टेन्शन स्पष्टपणे दिसत आहे.

26 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वेसोबत सामना आहे, हा सामना भारताला जिंकावाच लागेल. यासोबत 1 मार्च 2026 रोजी भारतीय संघाचा वेस्ट इंडिजसोबतही सामना आहे. हा सामना देखील भारताला जिंकावा लागेल. हे दोन्ही सामने जिंकल्याशिवाय भारताकडे दुसरा काहीही पर्याय नाही. दक्षिण आफ्रिकेविरोधातच्या सामन्यातील पराभवानंतर स्पष्ट बोलताना सर्यकुमार यादव दिसला. क्षेत्ररक्षण असो किंवा फलंदाजी सर्वकाही चांगलेच पुढील सामन्यात करावे, असे सूर्याने म्हटले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...