Suryakumar Yadav: शतकी खेळीनंतर सूर्यकुमार यादवने चाहत्यांना केले खूश, प्रेक्षकांसोबत घेतला सेल्फी, व्हिडिओ व्हायरल

सुर्यकुमार यादव प्रेक्षकांसोबत सेल्फी घेत असतानाचा व्हिडीओ या कारणामुळे व्हायरल

Suryakumar Yadav: शतकी खेळीनंतर सूर्यकुमार यादवने चाहत्यांना केले खूश, प्रेक्षकांसोबत घेतला सेल्फी, व्हिडिओ व्हायरल
Suryakumar-yadav
Image Credit source: AFP
| Updated on: Nov 21, 2022 | 9:24 AM

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मागच्या काही दिवसांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने चांगली खेळी केल्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. कालच्या न्यूझिलंड (NZ)विरुद्धच्या मॅचमध्ये सुर्यकुमार यादवने चांगली खेळी केली. कमी चेंडूत त्यानं शतक झळकावलं. त्यामुळे टीम इंडियाने न्यूझिलंडविरुद्ध 65 धावांनी विजय मिळविला. कालचा सामना संपल्यानंतर न्यूझिलंडचा कर्णधार विल्यमसन म्हणाला की, अशी खेळी मी अद्याप पाहिली नव्हती.

टीम इंडिया आणि न्यूझिलंड यांच्यात T20 मालिका सुरु आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका होणार आहे. टीम इंडिया हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात पहिल्यांदा न्यूझिलंड दौऱ्यावर गेली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी लक्ष्मण यांच्याकडे दिली आहे. टीम इंडियामध्ये युवा खेळडू असल्याने कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु कालच्या मॅचमध्ये टीम इंडियाने चांगली खेळी केल्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला.

कालची मॅच संपल्यानंतर सुर्यकुमार यादवने प्रेक्षकांमध्ये जाऊन सेल्फी घेतला. त्याचबरोबर ऑटोग्रॉफ सुद्धा दिल्या, त्य़ामुळे मॅच पाहायला आलेले चाहते सुद्धा खूष झाले. तो व्हिडीओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.