स्केट कार्टींग नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये टीम एक्स्ट्रीमची उत्कृष्ट कामगिरी

नवी मुंबईच्या टीम एक्स्ट्रीमने दुसऱ्या स्केट कार्टींग राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी ९ पदके जिंकली, ज्यात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांचा समावेश आहे. या यशाने त्यांना बेलारूसमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहे. ही कामगिरी महाराष्ट्रातील स्केटिंग क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे.

स्केट कार्टींग नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये टीम एक्स्ट्रीमची उत्कृष्ट कामगिरी
SHIVANGSHU MUKHERJEE
| Updated on: Jan 20, 2026 | 11:51 AM

रुलर सर्फ इंडिया यांच्या वतीने आयोजित दुसरी स्केट कार्टींग नॅशनल चॅम्पियनशिप दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सोमय्या इंटरनॅशनल बँड ट्रॅक, सायन (मुंबई) येथे उत्साहात पार पडली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी देशभरातील विविध राज्यांमधून खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत नवी मुंबईच्या टीम एक्स्ट्रीमच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत एकूण नऊ खेळाडूंनी पदकांची कमाई केली.

स्केट कार्टींग हा स्केटिंगमधील एक नवीन व अत्यंत आव्हानात्मक प्रकार असून, या खेळात खेळाडूंना उजव्या व डाव्या बाजूने वेगवान टर्न घेत विविध हर्डल्स पार कराव्या लागतात. शारीरिक लवचिकता, तत्परता, सातत्य तसेच उत्कृष्ट फिटनेस या घटकांवर या स्पर्धेतील यश अवलंबून असते.

या राष्ट्रीय स्पर्धेत टीम एक्स्ट्रीमच्या खालील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदके पटकावली —

रिद्धी राहुल चाफेकर – २ रौप्य पदके

रिशिक बुरडे – २ कांस्य पदके

श्री मुखर्जी – २ कांस्य पदके

शिव मुखर्जी – २ कांस्य पदके

रित्विक राजीव – २ कांस्य पदके

रुद्र नवर – १ रौप्य व १ कांस्य पदक

अयान धीनांकरण – २ कांस्य पदके

स्वरूप सोनावणे – १ सुवर्ण व १ रौप्य पदक

अमेघ शेटे – २ कांस्य पदके

टीम एक्स्ट्रीमचे प्रशिक्षक करण सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली, नवी मुंबई येथे 100 पेक्षा अधिक खेळाडू नियमित प्रशिक्षण घेत आहेत. या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे या खेळाडूंची निवड आंतरराष्ट्रीय स्केट कार्टींग चॅम्पियनशिपसाठी करण्यात आली असून, ही स्पर्धा येत्या जून महिन्यात बेलारूस येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ऐरोली येथील माजी नगरसेवक श्री. एम. के. मडवी यांनी सर्व खेळाडूंना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे कौतुक केले तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. टीम एक्स्ट्रीमच्या या यशस्वी कामगिरीमुळे महाराष्ट्रातील स्केटिंग क्षेत्रात नव्या खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.