Rinku Singh : 20 वर्षाच्या मुलासमोर हतबल ठरलेल्या रिंकूची दुसऱ्या सामन्यात कमाल, फक्त 45 चेंडूत समोरच्या टीमचा संपवला खेळ

Rinku Singh : UP T20 लीगमध्ये टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रिंकू सिंहने कमाल केली. त्याने तुफानी फलंदाजीचा नजराणा पेश केला. मागच्या सामन्यात हाच रिंकू एका 20 वर्षाच्या गोलंदाजासमोर हतबल ठरलेला. पण काल त्याने अपयशाची सव्याज परतफेड केली.

Rinku Singh : 20 वर्षाच्या मुलासमोर हतबल ठरलेल्या रिंकूची दुसऱ्या सामन्यात कमाल, फक्त 45 चेंडूत समोरच्या टीमचा संपवला खेळ
Rinku Singh
Image Credit source: x
| Updated on: Aug 22, 2025 | 8:42 AM

लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रिंकू सिंहच तुफान पहायला मिळालं. त्याने अवघ्या 45 चेंडूत 225 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी करत वेगवान शतक झळकावलं. रिंकूने आपल्या टीमला शानदार विजय मिळवून दिला. याच दरम्यान त्याने 8 सिक्स आणि 7 फोर मारले. रिंकू सिंह मेरठ मॅवरिक्सचा कॅप्टन आहे. एकवेळ मेरठ टीमने 38 धावात 4 विकेट गमावलेले. मेरठ मॅवरिक्सने सात चेंडू शिल्लक असताना 6 विकेटने विजय मिळवला. रिंकूने चौफेर फटकेबाजी केली. आशिया कप आधी टीम इंडियासाठी हे चांगले संकेत आहेत. UP T20 League 2025 लीग सुरु आहे. मागच्या सामन्यात रिंकू सिंह अपयशी ठरला होता. 20 वर्षाचा मुलगा पर्व सिंहच्या फिरकीच्या जाळ्यात तो फसला होता. त्याने 19 चेंडूत फक्त 23 धावा केल्या होत्या. त्याचं हे खराब प्रदर्शन टीमच्या पराभवाच कारण ठरलं होतं. काल रिंकू कॅप्टन इनिंग्स खेळला. लौकीकाला साजेसा खेळ दाखवत मागच्या सामन्यातील अपयश धुवून काढलं.

लखनऊच्या इकाना स्टेडियमवर UP T20 लीगचा नववा सामना खेळला गेला. गोरखपुर लायंस आणि मेरठ मॅविरक्समध्ये ही मॅच झाली. प्रथम फलंदाजी करताना गोरखपुर लायंसने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट वर 167 रन्स केले. 168 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या मेरठ मॅवरिक्सने खराब सुरुवात केली. 38 धावात त्यांचे अवघे 4 फलंदाज तंबुत परतले होते. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कॅप्टन रिंकू सिंहने युवराजसोबत मिळून 65 चेंडूत नाबाद 130 धावांची भागीदारी केली. गोरखपुरच्या तोंडातून त्यांनी विजयाचा घास हिरावला. रिंकू सिंहने 48 चेंडूत 7 फोर आणि 8 सिक्सच्या बळावर नाबाद 108 धावा केल्या.

चांगली सुरुवात झाली नाही

साहब युवराजने 22 चेंडूत 22 रन्स केल्या. दोघांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर मेरठने 18.5 ओव्हर्समध्ये 6 विकेट राखून विजय मिळवला. त्याआधी गोरखपुरने टीमने सुद्धा चांगली सुरुवात केली नव्हती. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गोरखपुर टीमची चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचा पहिला विकेट 3 रन्सवन गेला. आर्यन जुयाला खात न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कॅप्टन ध्रुव जुरेल आणि आकाशदीप नाथने दुसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. ध्रुव जुरेलने आपल्या टीमकडून सर्वात जास्त 32 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 38 रन्स केल्या. आकाश दीपने 16 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 23 धावा केल्या.


तीन सामन्यातील हा दुसरा विजय

निशांत कुशवाहाने 24 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. शिवम शर्माने 14 चेंडूत 2 सिक्स आणि 1 चौकाराच्या मदतीने नाबाद 25 धावा केल्या. या प्रकारे गोरखपुरने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट वर 167 धावा केल्या. मेरठकडून विशाल चौधरी आणि विजय कुमारने 3-3 विकेट घेतल्या. जेशान अंसारीने दोन विकेट काढल्या. मेरठचा तीन सामन्यातील हा दुसरा विजय आहे. गोरखपुरने 3 पैकी आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे.