Tokyo Olympics 2021: ‘या’ ज्युदोपटू विरोधात खेळण्यापेक्षा दोन खेळाडूंची ऑलिम्पिकमधूनच माघार, ‘हे’ आहे कारण

टोक्यो ऑलिम्पकचा आज पाचवा दिवस आहे. आतापर्यंत अनेक धक्कादायक निर्णय समोर येत आहेत. दरम्यान एका ज्युदोपटू विरोधात खेळण्यापेक्षा ऑलिम्पमधून बाहेर जाण्याची पसंतीच दोन खेळीडूंनीं दाखवली

Tokyo Olympics 2021: 'या' ज्युदोपटू विरोधात खेळण्यापेक्षा दोन खेळाडूंची ऑलिम्पिकमधूनच माघार, 'हे' आहे कारण
तोहार बुटबुल

Tokyo Olympics 20-2021 : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन वादाचे पडसाद आता टोक्यो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympic) मैदानातही उमटू लागले आहेत. इस्त्रायलचा ज्युदोपटू तोहार बुटबुल (Tohar Butbul) याच्याविरुद्ध खेळण्यासाठी एका आठवड्यात दोन खेळाडूंनी नकार दिला आहे. आधी अल्जेरियाचा फेथी नौरीनने (Fethi Nourine) तोहार विरोधातील सामन्यातून नावं मागे घेतलं होतं. त्यानंतर आता सूडानच्या मोहम्मद अब्दुल रसूलनेही तोहार विरोधात खेळायला नकार दिला आहे.

या दोघांनी देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन देशात सुरु असलेल्या वादामुळे हा निर्णय घेतला आहे. इस्त्रायल पॅलेस्टाईवर अन्याय करत असल्याची प्रतिक्रिया देत दोन्ही खेळाडूंनी हा निर्णय घेतला. हे दोन्ही खेळाडू पॅलेस्टाईनचे समर्थन करत आहेत.

नौरीन स्पर्धेतून बाहेर

सर्वात आधी अल्जेरियाचा जागतिक क्रमवारीत 469 व्या क्रमांकावर असणाऱ्या फेथी नौरीनने 73 किलो वजनी गटात तोहार विरोधात असणाऱ्या सामन्यापूर्वी स्वत:हून नाव मागे घेतलं होतं. पत्रकारांना दिलेल्या माहितीत नौरीन म्हणाला, ”मी ऑलिम्पिक खेळांमध्ये पात्रता मिळवण्यासाठी खूप मेहनत केली आहे. पण माझ्यासाठी पॅलेस्टाईनचा मुद्दा जास्त गंभीर आहे. मी कायमच या मुद्द्याला घेऊन गंभीर आहे. इस्त्राईल करत असलेल्या अत्याचारांचा निषेध म्हणून मी हा निर्णय घेत आहे.” दरम्यान अशा तडकाफडकी निर्णयामुळे ऑलिम्पिक समितीने नौरीनला घरी पाठवलं आहे. दुसरीकडे तोहारला राउंड ऑफ 16 च्या सामन्यात कॅनडाच्या आर्थर मार्गेलिडनकडून पराभव पत्करावा लागला.

हे ही वाचा

Tokyo Olympics 2021: भारताची बॉक्सर लवलीना पदकापासून एक पाऊल दूर, उपांत्यपूर्व फेरीत दाखल

Tokyo Olympics: भारताचा स्पेनवर 3-0 ने विजय, रुपिंदरपालसिंह सामन्याचा हिरो, हॉकीत भारताचा दुसरा विजय

Tokyo Olympics 2021: मनिका बत्राला पराभवानंतर अश्रू अनावर, राष्ट्रीय प्रशिक्षकासोबतही वाद, ‘हे’ आहे नेमकं कारण

(Due to Israel palestinine controversy Two players denies to play against Israeli judoka Tohar Butbul)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI