AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Palestine Conflict | इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धामुळे चर्चेत आलेलं हमास नेमकं काय?

सध्याच्या घडीला इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे एक नाव चर्चेत आलंय ते म्हणजे हमास. (What is Hamas its role in Israel-Palestine conflict)

Israel Palestine Conflict | इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धामुळे चर्चेत आलेलं हमास नेमकं काय?
Hamas
| Updated on: May 15, 2021 | 3:21 PM
Share

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे एक नाव चर्चेत आलंय ते म्हणजे हमास. मात्र असं काय झालं ज्यामुळे हमासची चर्चा होऊ लागली आणि त्याचा या सर्व युद्धजन्य परिस्थितीशी काय संबंध. याबद्दलच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (What is Hamas, how it rose to power and its role in Israel-Palestine conflict)

हमास नेमकं काय?

हमास ही पॅलेस्टाईनची सर्वात मोठी इस्लामी कट्टरतावादी संघटना आहे, ज्याची निर्मिती 1987 सालच्या आंदोलनावेळी झाली. या भागातील इस्रायली सेनेला हटवणं हाच गेल्या तीन दशकांपासून लढणाऱ्या हमासचं मुख्य उद्देश आहे.

कोणत्या वर्षी हमासची निर्मिती?

हमासचं पूर्ण नाव हरकत अल मुकावमा अल इस्लामिया आहे. याचाच अर्थ इस्लामिक रिजिस्टन्स मुव्हमेंट. रिजिस्टन्स म्हणजे प्रतिकार किंवा विरोध. या संघटनेची निर्मिती शेख अहमद यासीन या पॅलेस्टाईनच्या मौलानाने केली होती. तो इजिप्तच्या मुस्लिम ब्रदरहूड या पॅलेस्टिनी शाखेचा भाग होता. हमासच्या निर्मितीची वेळ फार महत्त्वाची मानली जाते. डिसेंबर 1987 मध्ये जेव्हा हमासची निर्मिती झाली. त्यावेळी पॅलेस्टाईनमध्ये इंतिफादाचीही सुरुवात झाली. इंतिफादा हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे उलथापालथ घडवणे. पॅलेस्टाईनमध्ये सुरु झालेल्या इंतिफादा चळवळीचा उद्देश होता की इस्रायलपासून मुक्ती मिळवणं. त्यांचं मुख्य लक्ष्य होतं ते वेस्ट बँक, गाझा आणि पूर्वी जेरुसलेमला इस्रायलच्या ताब्यातून सोडवणं.

Hamas

Hamas

हमासचं मुख्य ध्येय काय?

1987 च्या या चळवळीला फर्स्ट इंतिफादा म्हणूनही ओळखलं जातं. याला भडकवण्याचं तत्कालीन कारण होतं गाझा चेकपोस्टवर झालेली एक घटना. याठिकाणी एक पॅलेस्टेनियन लोकांचा समूह आंदोलन करत होता. इस्रायली सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला, ज्यात चार पॅलेस्टॅनियन मारले गेले. यानंतर साऱ्या पॅलेस्टाईनमध्येच आंदोलन सुरु झालं. या घटनेपर्यंत पॅलेस्टिनी हत्यारांविनाच लढत असत. विरोध करण्याचं त्यांचं मुख्य हत्यार होतं ते म्हणजे दगडफेक करणं. याच पार्श्वभूमीतून हमासची निर्मिती झाली. 1988 मध्ये हमासने आपलं चार्टरही जाहीर केलं. इस्रायला विनाश आणि पॅलेस्टाईनच्या ऐतिसाहिक भूभागावर इस्लामिक सोसायटीची स्थापना ही मुख्य ध्येयं हमासनं स्थापनेवेळी ठेवली.

याचदरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मोठ्या चर्चेनंतर 1993 मध्ये दोन मोठ्या गोष्टी घडल्या ज्यात पहिली होती. पॅलेस्टाईनच्या नेतृत्त्वाकडून इस्रायलला मान्यता देणं आणि दुसरं होतं गाझा आणि वेस्ट बँकमध्ये स्वत:च्या शासनासाठी पॅलेस्टिनींना अंतरिम सरकारवर करार. या करारावर इस्रायलकडून पंतप्रधान यितझाक रॉबिन यांनी तर पॅलेस्टाईनकडून यासिर अराफात यांनी स्वाक्षऱ्या केल्या. अराफात PLO या पॅलेस्टिनी स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख संघटना होती.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धात हमासला नुकसान 

एक काळ असा होता ज्यावेळी PLO पॅलेस्टाईनच्या संपूर्ण भूभागाच्या स्वातंत्र्यासाठी मागणी करत होती. वाटणीलाही विरोध करत होती. मात्र 1988 मध्ये इस्रायलच्या निर्मितीनंतर तब्बल 40 वर्षांनी PLO ला कळून चुकलं की इस्रायलला पूर्णपणे मुक्त करणं सहज शक्य नाही. यापेक्षा पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांना थोडी सवलत दिली जाईल, ज्यात ते वाटाघाटीसाठी प्रयत्न करतील. मात्र बऱ्याचदा चर्चा होऊनही दोन्ही राष्ट्रांमधील वाद काही मिटला नाही. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये यापूर्वीही अनेक युद्ध झालीत आणि यामुळे कुठेतरी जास्त नुकसान हमासलाच झालंय. (What is Hamas, how it rose to power and its role in Israel-Palestine conflict)

संबंधित बातम्या : 

जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीत असं काय घडलं की इस्राईल-हमास रॉकेट हल्ले करायला लागले? वाचा संपूर्ण प्रकरण

इस्राईलने सीमेवर हजारो सैनिक पाठवले, गाजावर शेकडो हवाई हल्ले, हिंसा थांबणार की युद्ध पेटणार?

LIVE Video: इस्त्रायलच्या रॉकेट हल्ल्यात जेव्हा 14 माळ्याची बिल्डींग जमीनदोस्त होते

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.