AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीत असं काय घडलं की इस्राईल-हमास रॉकेट हल्ले करायला लागले? वाचा संपूर्ण प्रकरण

इस्त्राईल आणि पॅलेस्टाईमधील वाद गंभीर होत आहे. जेरुसलेमच्या अल-अक्सा मशिदीत सुरु झालेल्या वादाची झळ आता थेट गाजापर्यंत पाहचते आहे.

जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीत असं काय घडलं की इस्राईल-हमास रॉकेट हल्ले करायला लागले? वाचा संपूर्ण प्रकरण
| Updated on: May 13, 2021 | 5:03 PM
Share

Israel Palestine Al Aqsa : इस्त्राईल आणि पॅलेस्टाईमधील वाद गंभीर होत आहे. जेरुसलेमच्या अल-अक्सा मशिदीत सुरु झालेल्या वादाची झळ आता थेट गाजापर्यंत पाहचते आहे (Israel Palestine Conflict). यानंतर पॅलेस्टाईनच्या सशस्त्र इस्लामिक कट्टरपंथी संघटना हमासने देखील इस्त्राईलवर रॉकेट हल्ले करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूने एकमेकांवर हल्ले होत आहेत. रॉकेट हल्ल्यांमध्ये आतापर्यंत गाजात 14 मुलांसह 65 लोकांचे मृत्यू झालेत. दुसरीकडे इस्राईलमध्ये देखील 7 लोकंचा मृत्यू झालाय. म्हणूनच हा संघर्ष होण्यामागील घटनाक्रम समजून घेऊयात (Know all about Israel Palestine Conflict History and Al-Aqsa Mosque).

हा वाद शुक्रवारी (7 मे) रात्री उशिरा मुस्लीम धर्मातचं पवित्र स्थळ मानल्या जाणाऱ्या अल-अक्सा मशिदीपासून (Al-Aqsa Mosque) सुरु झाला. रमजानचा शेवटचा जुम्मा होता (Israel Palestine Conflict History). यावेळी इस्राईलच्या पोलिसांनी मशिदीत छापेमारी केल्याचा आरोप करण्यात येतोय. यानंतर पोलीस आणि मुस्लीम नागरिकांमध्ये झडप झाली. यानंतर इस्राईलच्या पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या पॅलेस्टाईनच्या आंदोलकांवर रबर बुलेट्स आणि स्टेन ग्रेनेडचा वापर केला. याबाबत अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत. हा वाद जमिनीच्या एका तुकड्यावरुन झाला. या घटनेनंतर इस्राईलचे संबंध ज्या देशांसोबत सुधारताना दिसत होते ते बिघडले आहेत. तुर्की आणि पाकिस्तानने इस्राईलच्या कारवाईचा निषेध केला आहे.

मुस्लीम समुहासाठी अल-अक्सा मशिदीचं महत्त्व काय?

मुस्लीम धर्मात 3 सर्वात पवित्र स्थळं आहेत. यातील दोन मक्का आणि मदिना सौदी अरबमध्ये आहेत. उर्वरीत एक जेरुसलेममधील अल-अक्सा मशिद आहे. ही मशिद जुन्या जेरुसलेमचा भाग आहे (Israel Palestine Attack Reason). हे तेच ठिकाण आहे ज्यावर मुस्लीम, ख्रिश्चन आणि यहुदी असे तिन्ही धर्म आपलं असल्याचा दावा करतात.

जेरुसलेम या जुन्या शहराची धर्माच्या आधारावर विभागणी करण्यात आलीय. याच्या मुस्लिम क्वार्टरमध्ये अल-अक्सा मशिद आणि डोम ऑफ द रॉक आहे. ईसाई क्वार्टरमध्ये एक चर्च आहे आणि यहूदी क्वार्टरमध्ये विलिंग वॉल आहे. येथे यहुदी धर्माच्या प्राचीन मंदिराचे अवशेषही आहेत. हे ठिकाण सीमेपासून अगदी जवळ आहे (Israel Palestine Al Aqsa). यावर इस्राईल आणि पॅलेस्टाईन दोन्ही देश दावा करतात. सध्या या ठिकाणचं नियंत्रण इस्राईलकडे आहे. त्यामुळेच अनेक पॅलेस्टाईन नागरिक सीमा पार करुन अल-अक्सापर्यंत येऊ शकतात. या ठिकाणी सर्व धर्माचे नागरिक आपआपल्या ठिकाणी प्रार्थना करतात.

नुकताच झालेला वाद काय?

जेरुसलेमच्या जुन्या शहराजवळ एक शेख जर्राह नावाचं शहर आहे. येथे बहुतांश पॅलेस्टाईनचे नागरिक आहेत. मात्र, ही जागा कुणाच्या मालकीची यावरुनच संपूर्ण वाद सुरु झालाय (Israel Hamas Conflict). अनेक दशकं इस्राईलच्या सर्वोच्च न्यायालयात यावरील एक केसही सुरु आहे. यावर निकाल देताना न्यायालयाने या ठिकाणी राहणाऱ्या पॅलेस्टाईनच्या नागरिकांना हटवण्याचे आणि त्याऐवजी इस्राईलच्या नागरिकांना वसवण्याचे आदेश दिले. यावरुनच पॅलेस्टाईन आणि अन्य मुस्लीम देश संतापले आहेत. त्यातच रमजानच्या महिन्यात पॅलेस्टाईनचे लोक नमाज पठणासाठी अल-अक्सा मशिदीत आले होते. त्यावेळी हा वाद उफाळला.

मशिदीच्या परिसरात असलेल्या नागरिकांमधील काहींनी इस्राईलच्या पोलिसांवर दगडफेक केल्याचा, फटाके फोडत पोलिसांवर हल्ला केल्याचाही आरोप होतोय. यानंतर इस्राईलच्या पोलिसांनी मशिदीत घुसून पोलिसांवर कारवाई केली (Israel Hamas Airstrike). अनेक लोकांना अटक करण्यात आली. त्यानंतर हा वाद पेटला. याला प्रत्युत्तर देताना हमासने इस्राईलवर रॉकेट हल्ले केले. हे हल्ले प्रतिहल्ले अजूनही सुरुच आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागत आहे.

हेही वाचा :

Israel Palestine: हमासने डागलेली 100 रॉकेटस् इस्रायलकडून हवेतच नष्ट

सौम्या संतोष पतीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती, हमासनं डागलेलं क्षेपणास्त्र घरावर पडताच सगळं संपलं

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा संघर्ष, 100 रॉकेट डागली, 20 नागरिकांचा बळी

व्हिडीओ पाहा :

Know all about Israel Palestine Conflict History and Al-Aqsa Mosque

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.