AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौम्या संतोष पतीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती, हमासनं डागलेलं क्षेपणास्त्र घरावर पडताच सगळं संपलं

हमासनं इस्त्राईलवर केलेल्या हल्ल्यामध्ये भारतातील  सौम्या संतोष (Soumya Santosh)या महिलेला जीव गमवावा लागला आहे. Soumya Santosh killed in Israel

सौम्या संतोष पतीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती, हमासनं डागलेलं क्षेपणास्त्र घरावर पडताच सगळं संपलं
सौम्या संतोष
| Updated on: May 12, 2021 | 3:26 PM
Share

नवी दिल्ली: इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सोमवारी पुन्हा संघर्षाला तोंड फुटले होते. यामध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरु झाले आहेत. सोमवारी हमासने इस्रायलच्या (Israel) दिशेने 100 क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. हमासनं इस्त्राईलवर केलेल्या हल्ल्यामध्ये भारतातील  सौम्या संतोष (Soumya Santosh)या महिलेला जीव गमवावा लागला आहे. हमासनं डागलेलं क्षेपणास्त्र सौम्या संतोष ज्या घरात होती त्यावर घरावर कोसळलं यामध्ये तिचा मृत्यू झाला. सौम्या संतोष ही केरळमधी इडुक्की मधील होती. इस्त्राईलमध्ये गेल्या सात वर्षांपासून केअर टेकर म्हणून ती काम करत होती. (Kerala woman Soumya Santosh killed in rocket strike in Israel)

सौम्या संतोष पतीसोबत बोलत असताना घरावर क्षेपणास्त्र पडलं

इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष सोमवारी पहाटे सुरु झाला. हे सुरु असतानाच सौम्या संतोष तिच्या पतीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती. सौम्याच्या घरावर क्षेपणास्त्र पडलं आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. सौम्या संतोषच्या नातेवाईक शर्लिन बेबी यांनी ही घटना स्थानिक प्रमाणवेळेनुसार 3 वाजता घडली. त्या ज्यावेळी सौम्याच्या घराजवळ पोहोचल्या तेव्हा सर्व नष्ट झालं होतं, असं म्हणाल्या. सौम्या आणि एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.

गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत

सौम्या संतोष गेल्या 7 वर्षांपासून इस्त्राईलमध्ये केअर टेकर म्हणून काम करत होत्या. 2017 मध्ये त्या त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आल्या होत्या. सौम्या संतोष हिच्या पतीचा भाऊ साजी यांनी ही माहिती दिली. सौम्या संतोष हिचे पती संतोष हे शेतकरी आहेत. त्यांना एक मुलगा देखील आहे. सौम्या संतोष हिचं पार्थिव भारतात आणण्याची व्यवस्था केली जात आहे, असं साजी यांनी सांगितलं.

परराष्ट्र राज्य मंत्री व्ही मुरलीधरन यांच्याकडून शोक

भारताचे परराष्ट्र मंत्री व्ही मुरलीधरन यांनी ट्विट करुन सौम्या संतोष हिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुरलीधरन यांनी सौम्या संतोष हिच्या परिवाराचं सांत्वन केल्याची माहिती दिली. पीडित कुटुंबाची मदत करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात नेमका वाद काय आहे?

इस्रायलने 1967 साली मध्यपूर्वेतील युद्धानंतर जेरूसलेम ताब्यात घेतले होते. त्यानंतर इस्रायलयने हा परिसर यहुदी लोकांचा देश म्हणून घोषित केल होता. तेव्हापासून पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलविरोधात संघर्ष करत आहेत. पॅलेस्टाईन स्वतंत्र होईल तेव्हा जेरुसलेम ही आमची राजधानी असेल, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, आता इस्रायलने जेरुसलेममध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांनाच बाहेर काढायला सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या:

इराकमध्ये अमेरिकेच्या सैन्यावर 13 मिसाईल हल्ले, बायडन सरकारची रणनीती काय?

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा संघर्ष, 100 रॉकेट डागली, 20 नागरिकांचा बळी

(Kerala woman Soumya Santosh killed in rocket strike in Israel)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.