Fact Check : नीरज चोप्राबद्दलचं पाकिस्तानी खेळाडूचं ते ट्विट फेक, अकाऊंट बनावट असल्याचे उघड

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 09, 2021 | 7:30 AM

पाकिस्तानी भालाफेकपटू (जॅवलिन थ्रोअर) अर्शद नदीमने (Arshad Nadeem) टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला (Neeraj Chopra) त्याचा आदर्श म्हणून अभिनंदन केलंय?

Fact Check : नीरज चोप्राबद्दलचं पाकिस्तानी खेळाडूचं ते ट्विट फेक, अकाऊंट बनावट असल्याचे उघड
Arshad Nadeem, Neeraj Chopra

मुंबई : पाकिस्तानी भालाफेकपटू (जॅवलिन थ्रोअर) अर्शद नदीमने (Arshad Nadeem) टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला (Neeraj Chopra) त्याचा आदर्श म्हणून अभिनंदन केलंय? सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये एका ट्विटवरुन असाच काहीसा दावा केला जात आहे. भारताच्या नीरज चोप्राने शनिवारी टोकियो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. तेव्हापासून अर्शद नदीमच्या नावावर असलेल्या ट्विटर हँडलने (“ArshadNadeemPak”) केलेले एक ट्विट चर्चेत आहे. या ट्विटमध्ये इंग्रजीमध्ये लिहिले होते, “सुवर्णपदक जिंकल्याबद्दल माझा आयडॉल नीरज चोप्राचे अभिनंदन, पाकिस्तानी नागरिकांनो मला माफ करा, मी तुमच्यासाठी सुवर्णपदक जिंकू शकलो नाही.” (Pakistani javelin thrower Arshad Nadeem did not congratulate his idol Neeraj Chopra)

आता हे ट्विट डिलीट केले असले तरी, ते डिलीट करण्यापूर्वी हजारो लोकांनी हे ट्विट लाईक आणि रिट्विट केले होते. नदीमच्या या कथित ट्विटचे भारतात खूप कौतुक होत आहे. या ट्विटच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी नदीमचे त्याने नीरजला आपला आदर्श मानल्याबद्दल कौतुक केले आणि भालाफेक स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याबद्दल त्याचे अभिनंदनही केले. काही लोक असा प्रश्न देखील उपस्थित करत आहेत की, नदीमने हे ट्विट पाकिस्तानी लोकांच्या किंवा सरकारच्या दबावाखाली येऊन डिलीट केले का?

इंडिया टुडेच्या तपासात हे उघड झाले की, हे अर्शद नदीमचे ट्विटर अकाऊंट नसून त्याच्या नावाने बनावट हँडल तयार केले गेले आहे, सोबत त्याचा फोटोदेखील वापरण्यात आला आहे. शोधाशोध केल्यावर समोर आले आहे की, व्हायरल झालेल्या ट्विटवर कमेंट करताना काही युजर्सनी असे लिहिले होते की, हे अर्शद नदीमच्या नावाने तयार केलेले बनावट हँडल आहे. एका कमेंटनुसार, या ट्विटर हँडलचे आधी “CSS_25” असे नाव होते जे नंतर “अर्शद नदीमपाक” असे बदलण्यात आले.

जेव्हा आम्ही ट्विटरवर “CSS_25” हे हँडल शोधण्याचा प्रयतन केला, तेव्हा “अर्शद नदीमपाक” हँडलवरुन केलेले गेल्या महिन्यातील ट्विट्स पाहायला मिळाले. असं तेव्हाच होतं, जेव्हा एखाद्या ट्विटर अकाऊंटचं हँडल बदलून दुसरा काहीतरी शब्द/नाव वापरले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही ट्विटरवर जुने हँडल सर्च केल्यानंतर ट्विटर अनेकदा नवीन हँडल दिसतं.

इतर बातम्या

Tokyo Olympics 2021 : भारताची ऑलिम्पिकमधील विक्रमी कामगिरी, अमेरिका आणि चीनचा दबदबा, कुणाला किती पदकं?

Mirabai Chanu Birthday : ट्रेनिंग सेंटरला जाण्याचेही पैसे नसायचे, सरावासाठी 22 किमी दूरचा प्रवास, अनेक अडचणींवर मात करत पदक पटकावणारी मिराबाई

Neeraj Chopra : सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरजची लगोलग पुढची घोषणा, म्हणतो माझा पुढचा ‘कार्यक्रम’ ठरला!

(Pakistani javelin thrower Arshad Nadeem did not congratulate his idol Neeraj Chopra)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI